Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. हिंदीत सुरू झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पुढे मराठीतही हा कार्यक्रम सुरू झाला. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक स्पर्धक करोडपती झाले. तर काही स्पर्धकांनी आयुष्यातली पहिली कमाई या मंचाच्या माध्यमातून केली आहे.
भारती दबडेने आयुष्यातली पहिली कमाई केली 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर अनेक सेलिब्रिटींसह स्पर्धकदेखील सहभागी होत असतात. भारती दबडे या स्पर्धकाने आयुष्यातली पहिली कमाई 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर केली आहे. त्यामुळे भारती दबडेचं सर्वत्र कौतुक झालं होतं.
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरत असतो. या कार्यक्रमात सहभागी होण्याची अनेकांची इच्छा असते. कार्यक्रमात सहभागी होत स्पर्धक आपली खेळी दाखवत असतात. काही दिवसांपूर्वी बदलापूरच्या भारती दबडे यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आयुष्यातली पहिली कमाई केली आहे.
भारती दबडे या गृहिणीने ज्ञानाच्या मदतीने सर्वकाही शक्य आहे हे आपल्या खेळाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी होत भारती यांनी 25,00,000 कमाई केली.
भारती दबडेंनी केली 25,00,000 कमाई
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात आतापर्यंत विविध क्षेत्रांतील आणि वयोगटांतील स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. बदलापूरच्या भारती दबडे या गृहिणी आहेत. त्यांनी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुष्यातली पहिली कमाई केली आहे. भारती दबडे यांच्या उत्कृष्ट खेळाने गृहिणीनं ठरवलं तर ती काहीही करू शकते हे सिद्ध झालं आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडे यांनी आयुष्यातली पहिली कमाई केली आहे. या मंचावर त्यांनी 25,00,000 कमाई केली आहे.
आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याच स्वप्न 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाने सामान्य टीव्ही प्रेक्षकांना दाखवलं, अन् अल्पावधीतच हा शो तूफान लोकप्रिय झाला. या कार्यक्रमातील उत्कंठावर्धक प्रश्नांच्या खेळाने कित्येक सामान्य माणसाचं करोडपती होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं.
संबंधित बातम्या