Kon Honaar Crorepati : ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणणाऱ्या 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) या जगद्विख्यात कार्यक्रमाचं नवं मराठी पर्व लवकरच सुरू होणार आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत. 


गेल्या  पर्वामध्ये  सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. आपली देहबोली आणि आपला आवाज यांमुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. प्रत्येक खेळात कोणी  जिंकतं किंवा कोणी हरतं, पण या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो, असं  सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.



23 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी होण्यासाठीच्या नावनोंदणीला सुरुवात होणार आहे. 14 दिवस आणि 14 प्रश्न असं याचं स्वरूप आहे. 7039077772 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लिव्हवर नावनोंदणी करून  या खेळात सहभागी  होता येईल.


करोडपती बनण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, पण प्रत्येकाला तशी संधी मिळतेच असं नाही. पण आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून देणार आहे.


संबंधित बातम्या


Heropanti 2 Release Date : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' मध्ये मनोरंजनाचा डबल धमाका, ईदच्या मुहूर्तावर सिनेमा होणार प्रदर्शित


Badhaai Do Collection Day 1 : समलैंगिक जोडप्यांची प्रेमकहाणी मांडणारा 'बधाई दो' पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर अपयशी


Puducherry : स्मार्टफोनवर चित्रीत करून प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा ; 'पाँडीचेरी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha