Badhaai Do : राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा बहुप्रतिक्षित 'बधाई दो' (Badhai Do) सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. समलैंगिक जोडप्यांच्या प्रेमकहाणीवर भाष्य करणारा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णीने (Harshwardhan Kulkarni) केले आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने 1.20-1.40 कोटींची कमाई केली आहे.
कोरोनाकाळात प्रदर्शित झालेला 'बधाई दो' सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित झाला. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. या सिनेमाने पहिल्या दिवशी 1.20-1.40 कोटींची कमाई केली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत होते. पण सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडण्यात अपयशी ठरला आहे.
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्राच्या 'बधाई हो' सिनेमाचा 'बधाई दो' हा सिक्वेल आहे. सिनेमात राजकुमार एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून भूमी पेडणेकरने पीटी शिक्षिकेची भूमिका साकारली आहे.
या सिनेमात सीमा पाहवा, शीबा चढ्ढा आणि लवलीन मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
संबंधित बातम्या
Heropanti 2 Release Date : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' मध्ये मनोरंजनाचा डबल धमाका, ईदच्या मुहूर्तावर सिनेमा होणार प्रदर्शित
Break up Song : #BreakUpAnthemOfTheYear 'चांगली खेळलीस तू' प्रेक्षकांच्या भेटीला!
IPL 2022 Auction Preity Zinta : आयपीएल लिलावात प्रीती झिंटा गैरहजर; 'हे' आहे कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha