Heropanti 2 : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची (Tiger Shroff) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाच्या (Tara Sutaria) 'हीरोपंती 2' (Heropanti 2) सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. पण आता हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


सिनेमाची रिलीज डेट जाहीर करणारे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाची जोडी दिसत आहे. टायगर श्रॉफने इन्स्टाग्रामवर 'हीरोपंती 2' सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमधील टायगर आणि ताराचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.





या सिनेमाचे दिग्दर्शन अहमद खानने केले आहे. रिपोर्ट्सनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील टायगर आणि तारासोबत  'हीरोपंती 2' सिनेमात दिसणार आहे. 'हीरोपंती 2' सिनेमाचे शूटिंग लंडनमध्येदेखील करण्यात आले आहे.  सिनेमात टायगर धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे.  'हीरोपंती' सिनेमाद्वारे टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.



संबंधित बातम्या


Alia Bhatt-Ranbir Kapoor : ‘मी तर रणबीरशी केव्हाच लग्न केलंय...’, आलिया भट्टनं केला मोठा खुलासा!


Movie Announcement : "शक्ती, शक्ती शक्तिमान..." देसी सुपरहिरोचा जलवा; चाहत्यांसाठी खुशखबर! 


Lock Upp : ‘ना चलेगी भाईगिरी, ना पापा का पैसा’, कंगनाच्या नव्या शोचा धमाकेदार टीझर पाहिलात?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha