Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत मुनमुन 'बबिता जी' ही भूमिका साकारते. काही दिवसांपूर्वी मुनमुनला एका यूझरनं ट्रोल केलं होतं. या ट्रोलरला मुनमुननं सडेतोड उत्तर दिलं.
2018 मध्ये सोशल मीडियावर एका व्यक्तीनं आक्षेपार्ह कमेंट करून मुनमुनला ट्रोल केलं. त्या ट्रोलरला उत्तर देऊन मुनमुननं त्याला ब्लॉक केलं. मुनमुन त्या ट्रोलरला म्हणाली होती की, 'तुझ्या सारख्या माणसाकडे कोणी लक्ष देणार नाही पण मी विचार केला की ब्लॉक करण्याआधी तुला तुझी लायकी काय आहे ते सांगायला पाहिजे. तु तुझा हा कुरूप चेहरा दुसऱ्या कोणाला तरी दाखव. ' मुनमुन सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. पण काही जण तिला ट्रोल देखील करतात.
मुनमुन दत्ताचे नाव तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पू ही भूमिका साकारणारा राज अनादकटसोबत जोडले गेले. त्या दोघांच्या नात्याबद्दल सोशळ मीडियावर चर्चा झाली. असं म्हणलं जात होत की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पण ही केवळ अफवा आहे. मुनमुनने देखील सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
- Rashmika Mandanna : थिएटरमध्ये बसून रश्मिका मंदान्ना शिट्टी वाजवते तेव्हा...
- कौतुकास्पद! सोनू सूदनं अपघातात जखमी झालेल्या तरूणाची केली मदत, मोठा अनर्थ टळला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha