Ankita Prabhu Walawalkar : अंकिता (Ankita Prabhu Walawalkar ) बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) जाण्याआधी तिच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा होती. कारण अंकिताने स्वत:च एक पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासून अंकिता लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. पण घराबाहेर आल्यानंतर अंकिताने तिच्या लग्नाविषयी माहिती दिली आहे.
बिग बॉसच्या घरातून अंकिता वालावलकर ही पाचव्या स्थानावरुन बाहेर पडली. अंकिताने 16 स्पर्धकांमधून टॉप 6 मध्ये स्थान मिळवलं. पण ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन तिचा प्रवास संपला. बिग बॉसच्या घरात अंकिताने तिची एक वेगळी शैली तयार केली होती. त्याचप्रमाणे तिच्या खेळाचीही विशेष चर्चा झाली.
अंकिताने दिली लग्नाविषयी माहिती
अंकिताने लोकसत्ता ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न असेल की तू लग्न कधी करतेस? आणि तो कोकण हार्टेड बॉय कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिताने तिच्या लग्नाचा प्लॅन देखील सांगितला आहे. त्यावर अंकिताने म्हटलं की, कोकण हार्टेड बॉय कोण आहे, हे तुम्हाला लवकरच कळेल. पण लग्न फेब्रुवारीच्या आधी करण्याचा माझा विचार होता, मात्र सध्या खूप काम आहे. आता बघु सगळं कसं जमतंय... पण फेब्रुवारीच्या आधी संपूर्ण महाराष्ट्राला निक्कीच कळेल की कोकण हार्टेड बॉय कोण आहे... लग्न मी सिंधुदुर्गातच करेन.. ते छोटं असेल पण मुंबईत येऊन मी सर्वांना रिसेप्शन पार्टी देईन..
कोकण हार्टेड गर्ल कशी झाली फेमस?
अंकिता वालावलकर ( Ankita Prabhu Walawalkar) ही मूळची कोकणातली आहे. तिने युट्युबवर तिच्या 'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने पेज सुरु केलं. सध्या तिच्या या युट्युबच्या पेजवर 268 लाख इतके सबस्क्राइबर्स आहेत. अंकिता तिच्या युट्युब चॅनलवर कोकणातले अनेक व्हिडीओ टाकत असते. त्यावरुन तिची कोकण हार्टेड गर्ल अशी ओळख झाली. त्याचप्रमाणे अंकिताचा स्वत:चा व्यवसाय देखील आहे. बिग बॉसच्या घरातही अंकिताचा कोकणी अंदाज पाहायला मिळाला.