Abhijeet Sawant : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) पाचव्या सीझनची नुकतीच सांगता झाली. रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) होस्ट करत असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला असल्याचं पाहायला मिळालं. बारामतीच्या सूरज चव्हाणने यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. याच ट्रॉफीसह सूरजला (Suraj Chavan) 14 लाखांची रोख रक्कम देण्यात आली. इतकच नव्हे तर त्याला 10 लाखांचं गिफ्ट वाऊचरही मिळालं. पण या सगळ्यात अभिजीत (Abhijeet Sawant) केवळ गिफ्ट वाऊचर मिळालं असल्याच्या चर्चा आहेत.
या चर्चा सुरु असल्या तरीही अभिजीतने बिग बॉसच्या या सीझनमध्ये सूरजपेक्षा जास्त पैसे कमावले असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. कारण अभिजीतने एका आठवड्यासाठी सूरजच्याही तिप्पट पैसे घेतले असल्याचं सांगण्यात येत आहे. अभिजीतच्या दर आठवड्यांच्या कमाईची रक्कम ही सूरजच्या रकमेच्या 14 टक्क्यांनी जास्त असल्याचं म्हटलं जातंय.
सूरजपेक्षा अभिजीतची कमाई जास्त
कोई मोई डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, सूरजला बिग बॉसच्या घरात प्रत्येक आठवड्यासाठी 25 हजार रुपये देण्यात येत होते. त्यामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये ही रक्कम केवळ 2 लाख 50 हजार इतकीच होते. अभिजीत मात्र प्रत्येक आठवड्यासाठी तीन ते पाच लाख रुपये घेत होता. म्हणजे त्याने शेवटच्या आठवड्यापर्यंत 35 लाख रुपयांची कमाई केली. त्या तुलनेत बक्षीसाच्या रकमेसह सूरज घरातून जवळपास 26 ते 27 लाख रुपये घेऊन बाहेर पडला असल्याचं सांगण्यात येत आहे.
बिग बॉसच्या घरात कुणी किती कमावले?
या सीझनमध्ये अभिजीत सावंतला दर आठवड्यासाठी 3 लाख 50 हजार रुपये इतकं मानधन मिळत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे अभिजीत या सीझनमधील निक्कीनंतर दुसरा महागडा स्पर्धक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर वर्षा उसगांवकर यांनी आठवड्यासाठी अडीच लाख रुपये इतकं मानधन घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे.
निखिल दामले सव्वा लाख रुपये, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर या दोघी जणी प्रत्येक आठवड्याला प्रत्येकी एक लाख रुपये इतकं मानधन घेत असल्याचं सांगण्यात आलं. वैभव चव्हाण 70 हजार रुपये, आर्या जाधव एक लाख रुपये, छोटा पुढारी 50 हजार, धनंजय पोवार 60 हजार, अंकिता वालावलकर 50 हजार, आणि पुरुषोत्तम दादा पाटील यांना 1 लाख 35 हजार इतकं मानधन देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.