The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. 23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. कपिल शर्मा (Kapil Sharma),कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek),भारती सिंह (Bharti Singh),किकू शारदा (Kiku Sharda)  हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. तसेच अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) देखील या शोमध्ये काम करतात. जाणून घेऊयात, 'द कपिल शर्मा शो' चे हे कलाकार एका एपिसोडचे किती मानधन घेतात.


कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek)
द कपिल शर्मा शोमधील कृष्णा अभिषेकच्या विनोदांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. कृष्णा वेगवेगळ्या अभिनेत्यांची अॅक्टिंग करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. रिपोर्टनुसार तो द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडमध्ये काम  करण्यासाठी 10 ते 12 लाख मानधन घेतो. 


किकू शारदा (Kiku Sharda)
द कपिल शर्मा शोमध्ये बच्चा यादव ही भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदाचा चाहता वर्ग मोठा आहे. रिपोर्टनुसार तो द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडचे 5 ते 7 लाख मानधन घेतो. 


भारती सिंह (Bharti Singh)
प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंह द कपिल शर्मा शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारते भारती या शोसाठी 10 ते 12 लाख मानधन घेते.


कपिल शर्मा (Kapil Sharma)
द कपिल शर्मा शोचे सूत्रसंचालन कपिल शर्मा करतो. या शोच्या एका एपिसोडसाठी कपिल 30 ते 35 लाख मानधन घेतो. 


अर्चना पूरन सिंह(Archana Puran Singh)
शोची परीक्षण अर्चना पूरन सिंह ही या शोच्या एका एपिसोडचे 10 ते 12 लाख मानधन घेते.


संबंधित बातम्या


The Kapil Sharma Show : 'मुंबईत राहतो आणि मराठी बोलत नाही'; सोनालीनं कपिलला सुनावलं
Best Shows Of 2021: 2021 मध्ये टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिका अव्वल; प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha