Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) हा कार्यक्रम प्रेक्षकांना आता सलग चार दिवस पाहता येणार आहे. त्यामुळे मनोरंजनाची चव वाढणार आहे. 'किचन कल्लाकार' हा कुकरी शो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 


प्रशांत दामले उत्तम खवय्ये आहेत. त्यामुळे ते 'किचन कल्लाकार'या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहेत. पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचन कल्लाकारच्या किचनमध्ये कस लागत असतो. 'किचन कल्लाकार'च्या मंचावर कलाकार पाककलेचे शिवधनुष्य पेलवत असतात.





किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना मजा येत असते. किचन कल्लाकार'च्या मंचावर महाराज म्हणजेच प्रशांत दामलेंची खवय्येगिरी प्रेक्षकांना पाहायला मिळते. किचन कल्लाकारचा आगामी भाग प्रेक्षकांना 9 ते 12 मार्चला पाहायला मिळणार आहे. आगामी भागात कोण स्पर्धक असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


संबंधित बातम्या


Mahesh Tilekar : 'नाटकी कलाकारांची झुंडशाही', महेश टिळेकरांची मराठी कलाकारांवर टीका


'कश्मीर फाइल्स' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी जनहित याचिका


Housefull : अखेर थिएटर गजबजलं.. सिने-नाट्यगृहाबाहेर झळकले हाऊसफुल्लचे बोर्ड


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha