Marathi Serial : छोट्या पडद्यावर ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत सध्या ‘आई’ अर्थात ‘अरुंधती’ तिच्या स्वप्नांच्या दिशेन नवी भरारी घेताना दिसतेय. मालिकेतील रोजचे नवे कथानक, नवे ट्विस्ट आणि टर्न्स ‘आई कुठे काय करते’ला आणखी मनोरंजक बनवत आहेत. अरुंधतीला रोजच नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे
एकीकडे कांचन आणि अनिरुद्ध अरुंधती विरोधात गेले आहेत, तर दुसरीकडे संजना देखील आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. संजना सतत काहीना काही सांगून सगळ्यांचे कान भरण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच अरुंधतीने स्वतःसाठी भाड्याचा फ्लॅट घेतला आहे. अरुंधती आता या घरात शिफ्ट झाली आहे.
संजनाचे कारनामे सुरूच!
अरुंधतीने घरातून वेगळं व्हायचा निर्णय घेतल्यावर देशमुखांच्या घरातील अनेकांचा संताप झाला. देशमुखांच्या समृद्धी बंगल्याचा अर्धा हिस्सा हा अरुंधतीच्या नावावर असल्याने संजना पुन्हा एकदा हा हिस्सा आपल्याला मिळवता येईल का याचा विचार करते. यावेळी ती कांचनला म्हणते की, आता अरुंधती या घरातही राहत नाही, मग या घरावर तिचा हक्क कसा? हे ऐकून कांचनदेखील अरुंधतीकडून तिचा हा हिस्सा परत मागून घेते.
आता पुन्हा एकदा संजनाने अरुंधती विरोधात घरच्यांचे कान भरण्यास सुरुवात केली आहे. घरातील सगळी मंडळी अरुंधतीकडे गेलेली पाहून संजना कांचन आणि अभिला भडकवायला सुरुवात करते. ‘अरुंधतीवर आता कसलंच बंधन नसणार आहे. आता तिचे खूप लाड होत असतील. तिला तुमची काळजी नाही’, असं सांगते. यावर कांचन तिला विचारते की, हे दोघे ऑफिसमध्ये कसे वागतात? तर, उत्तर देताना संजना म्हणते, ते ऑफिसमध्ये एकदम प्रोफेशनल वागतात लोकांना दाखवण्यासाठी, पण आता ते तिचं घर आहे, तेव्हा ते कसेही वागायला मोकळे आहेत. हे ऐकून अभिषेक आणि कांचन चिडतात.
आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र, आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळाली आहे. तिच्या या प्रवासात अप्पा आणि आशुतोष नेहमीच तिच्या सोबत असणार आहेत.
हेही वाचा :
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे थांबले उर्वशी रौतेलाच्या चित्रपटाचे शूटिंग
- Jhund Box Office Collection Day 1: नागराज मंजुळेंच्या 'झुंड'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन, पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!
- आलिया भटच्या Gangubai Kathiawadi ची बॉक्स ऑफिसवर धमाल, 100 कोटी क्लबमध्ये समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha