Housefull Board : राज्य सरकराने सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 100 टक्के आसनक्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिल्याने सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 100 टक्के आसनक्षमतेने सिने-नाट्यगृहे सुरू झाल्यानंतरच्या 6 मार्चच्या रविवारी सिने-नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकलेले दिसून आले. 


अनन्या नाटकाचा रविवारी विले पार्लेतील नाट्यगृहात 300 वा गौरवशाली प्रयोग रंगला.या प्रयोगाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महिला दिनानिमित्त खास 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रयोगदेखील महिला प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल केला.





सध्या राज्य नाट्य स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतदेखील तरुण रंगकर्मीचा उत्साह दिसून येत आहे. अशातच एकांकिका स्पर्धादेखील पुन्हा नव्या जोशात सुरू झाल्या आहेत. 


बॅटमॅन, झुंड, पावनखिंड, गंगूबाई काठियावाडी सारखे सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. कोरोनानंतर या सिनेमांनी चांगलीच कमाई केली आहे. हे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात जात आहेत.


संबंधित बातम्या 


Me Vasantrao : सांगीतिक रंगाची उधळण! शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत रंगला ‘मी वसंतराव’चा संगीत सोहळा!


Netflix Ban in Russia: रशिया-युक्रेन युद्धाचा मनोरंजनविश्वावरही परिणाम, नेटफ्लिक्सकडून रशियातील सेवा स्थगित!


Attack Trailer : 'अटॅक'सिनेमाचा ट्रेलर आऊट, जॉन अब्राहम अॅक्शन मोडमध्ये


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha