Kiran Mane :   राजकीय पोस्ट केल्या प्रकरणी आपल्याला स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो (mulgi jhali ho) या मालिकेतून काढून टाकले असल्याचा आरोप किरण माने (Kiran Mane ) यांनी  केला होता. यानंतर त्यांच्या विरोधात सहकलाकारांनी पुढे येत गैरवर्तवणूकीची कारणे दिली होती. सेटवर त्यांचे वागणे आपत्यजनक होते, चुकीचे शब्द वापरले जायचे , याबाबत त्यांना समज देवूनही त्यांच्यात फरक पडला नसल्याचे सहकलाकारांनी आरोप केला आहे. यावरूनच त्यांना मालिका मधूनकाढले असल्याचे स्पष्टीकरण स्टार प्रवाहकडून देण्यात आले आहे. मात्र हे कारण म्हणजे दोन दिवसात ठरवून माझ्या विरोधात केलेले षड्यंत्र असल्याचा आरोप किरण माने यांनी केलाय. आपण चुकीचे वर्तन केले असते तर इतर महिला सहकलाकार आपल्यासाठी पुढे आल्या नसत्या, असं किरण माने म्हणाले.


आरोप करणाऱ्या एका महिला कलाकाराचे पती भाजपाचे पदाधिकारी असल्याचे सांगत यामागे राजकीय दहशतवाद असल्याचे स्पष्टीकरण माने यांनी दिलय. फिल्म इंडस्ट्रीत नेहमीच बहुजन कलाकारांवर अन्याय होत असून या विरोधात आपण लढणार असल्याचे किरण माने यांनी सांगितले आहे.


मुलगी झाली हो या मालिकेतील एका अभिनेत्रीने किरण माने यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  किरण मानेंवर गंभीर आरोप करत मालिकेतील महिला कलाकार म्हणाल्या,"माने हे सतत टोमणे मारायचे. किरण माने यांच्यामुळे ही मालिका चालते, असा गैरसमज त्यांचा झाला होता". मी आहे म्हणून चाललंय सगळं, मी कुणालाही कधीही काढून टाकेन, अशी भाषा त्यांनी वापरल्याचाही दावा किरण माने यांच्या सहकलाकारांनी केला आहे. तसेच  अभिनेत्री दिव्या पुगावकरनेदेखील किरण मानेंवर गंभीर आरोप केले होते. दिव्या म्हणाली, "किरण मानेंनी सेटवर अपशब्द वापरले. मला सारखे टोमणे मारले". 


इतर बातम्या :


किरण मानेंचे आरोप बिनबुडाचे, महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्यानं मालिकेतून काढलं, स्टार प्रवाहचं स्पष्टीकरण


Hunarbaaz : शहनाज गिलने तिच्या आवाजाने जिंकली चाहत्यांची मने, व्हिडिओ व्हायरल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha