Kiran Mane : अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढल्यामुळे सध्या ते सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. राजकीय भूमिका सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे किरण यांना मालिकेतून काढण्यात आलं, असं म्हटलं जात होतं. काही मंडळी किरण माने यांना पाठिंबा दर्शवत आहेत तर काही जण त्यांना ट्रोल करत आहेत. त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्टीकरण देत किरण यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान याच मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींनी किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. 


स्टार प्रवाह वाहिनीने म्हटले आहे की,"महिला कलाकारांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आले आहे. किरण माने यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत". किरण मानेंवर गंभीर आरोप करत मालिकेतील महिला कलाकार म्हणाल्या,"माने हे सतत टोमणे मारायचे. किरण माने यांच्यामुळे ही मालिका चालते, असा गैरसमज त्यांचा झाला होता". मी आहे म्हणून चाललंय सगळं, मी कुणालाही कधीही काढून टाकेन, अशी भाषा त्यांनी वापरल्याचाही दावा किरण माने यांच्या सहकलाकारांनी केला आहे.


'मुलगी झाली हो' मालिकेत किरण माने हे दिव्या पुगावकरच्या वडिलांची भूमिका साकारत होते. दिव्या पुगावकरनेदेखील किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. दिव्या म्हणाली, "किरण मानेंनी सेटवर अपशब्द वापरले. मला सारखे टोमणे मारले". 


दरम्यान किरण मानेंनी रविवारी एक फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले होते,"प्रॉडक्शन हाऊसकडून  पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू. अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात 
बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे". 


[fb]


एका मुलाखतीमध्ये किरण यांनी सांगितले होते की, माझ्या राजकीय भूमिकेमुळे मला मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आले आहे. त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, 'काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.


संबंधित बातम्या


Udayanraje On Pushpa : उदयनराजेंवर पुष्पा चित्रपटाचा प्रभाव, गाण्यावर धुंद होत उदयनराजे साताऱ्यातील सेल्फी पाँईंटवर


किरण मानेंचे आरोप बिनबुडाचे, महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्यानं मालिकेतून काढलं, स्टार प्रवाहचं स्पष्टीकरण


विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्का शर्माची इमोशनल पोस्ट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha