Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत मल्हारची बायको आणि स्वराच्या आईचे वैदेहीचे पात्र उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) साकारत होती. आता मालिकेत स्वराच्या आईचे निधन होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकानुसार उर्मिला कोठारे मालिकेमधून एक्झिट घेणार आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता उर्मिलानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन या मालिकेबद्दल एक माहिती दिली आहे. 


उर्मिला शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणते, 'सध्या मालिकेमध्ये माझा मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे खूप चर्चा सुरू आहे. तसेच मी मालिका सोडली आहे अशी अफवा देखील पसरत आहे. त्यामुळे मला तुम्हाला सांगायला आवडेल की वैदेहीचा मृत्यू हा लेखकानं लिहिला होता. त्यानुसार गोष्ट सुरू आहे. मी मालिका सोडलेली नाही. मी कळकळीची विनंती करते अफवा पसरवू नका. मी स्वराच्या आठवणींमधून तुमच्या भेटीस येणार आहे' या व्हिडीओला उर्मिलानं कॅप्शन दिलं, 'तुझेच मी गीत गात आहे' ही स्टार प्रवाहवरील मालिका मी सोडलेली नाहिये.. स्वराच्या आठवणीत मी तुम्हा सर्वांना या पुढे ही दिसत राहणार आहे ...'


उर्मिलाचा व्हिडीओ








12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचं छोट्या पडद्यावर कमबॅक


उर्मिला कोठारेने तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. उर्मिलाने साकारलेली वैदेहीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केल्याने तिचे चाहतेदेखील खुश होते. आता उर्मिला मालिकेत दिसणार नसल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत. 




हेही वाचा :