Kaun Banega Crorepati Prize Money Tax : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या शोचे सूत्रसंचालन करतात. 'कौन बनेगा करोडपती' मध्ये हॉट सिटवर बसून काही प्रश्नांची उत्तरं देऊन कोट्यवधींचे बक्षीस जिंकण्याचे स्वप्न अनेकांचे असते. या कार्यक्रमामध्ये काही स्पर्धक लखपती होतात तर काही करोडपती. सध्या या कार्यक्रमाचा 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अनेकांना प्रश्न पडत असेल की, कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होऊन प्राइज मनी जिंकणाऱ्या स्पर्धाकांना बक्षिसाची संपूर्ण रक्कम मिळते का? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर... 

 

स्पर्धकाला किती पैसे मिळतात? 


कौन बनेगा करोडपती या शोमध्ये प्राइज मनी जिंकणाऱ्या स्पर्धकाला मिळाणाऱ्या बक्षिसातून टॅक्स कट केला जातो. जर स्पर्धक 50 लाख रुपयांचे बक्षीस जिंकतो, तर त्याच्या बक्षिसाच्या रकमेतून एक नाही दोन नाही तर जवळपास 13.30 लाख रुपये कराच्या स्वरुपात कट होतात. स्पर्धकाला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून 30 टक्के टॅक्स कापला जातो. त्याचबरोबर बक्षिसाच्या रकमेतून 10 टक्के (रु. 13,125) अधिभार आणि 4 टक्के (रु. 5,250) उपकरही कापला जातो. स्पर्धकाला 50 लाखांच्या बक्षीस रकमेऐवजी जवळपास 35 लाख रुपये मिळतात. 


केबीसी 14 चे नवे नियम
काही दिवसांपासून कौन बनेगा करोडपतीचा 14वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीझनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता बक्षिसाची रक्कम 7 कोटींऐवजी 7.5 कोटी रुपये आहे. तसेच 50 लाखांनंतर 75 लाख रुपयांचा एक प्रश्न देखील देण्यात आला आहे. आता स्पर्धकांना 50 लाखांनंतर 75 लाख रुपये जिंकण्याचीही संधी आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत एकही स्पर्धक करोडपतींच्या यादीत सामील झालेला नाही.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: