Aamir Ali : अभिनेता आमिर अली (Aamir Ali) आणि अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) ही एकेकाळी टीव्ही विश्वातील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी होती. या जोडीने रीलच नाही तर, रिअल आयुष्यातही एकमेकांची साथ स्वीकारली होत्ती. मात्र, लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेत वेगळं होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचा चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. या जोडीला एक मुलगी देखील आहे. संजीदासोबत घटस्फोटानंतर आता आपल्या लेकीला देखील भेटता येत नसल्याचे दुःख अभिनेता आमिर अलीने व्यक्त केले आहे.


आमिर आणि संजीदा यांनी त्यांच्या घटस्फोटावर आतापर्यंत मौन बाळगले होते. मात्र, नुकतीच अभिनेता आमिर अलीने (Aamir Ali) आपली व्यथा मांडली आहे. सध्या तो आपल्या कुटुंबावर आणि कामावर लक्ष केंद्रित करत आहे. मात्र, आता आयुष्यात पुन्हा प्रेम मिळवण्याचा विचार आपण करत नसल्याचे त्याने म्हटले. आमिर म्हणाला, घटस्फोटानंतर मी कोलमडून गेलो होतो. तसेच, संजीदा (Sanjeeda Shaikh) आता त्याच्या संपर्कातही नसल्याचे त्याने म्हटले आहे.


स्वतःच्या मुलीला भेटू शकत नाही!


आपली मुलगी आयराबद्दल बोलताना आमिर म्हणाला की, त्याला त्यांच्या मुलीला भेटण्याची परवानगी नाही. आमिर म्हणाला, ‘हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे आणि मला त्याबद्दल बोलायचे नाही. मला कोणतेही डाव खेळायचे नाहीत. परंतु, दुर्दैवाने नेहमी पुरुषालाच दोषी ठरवले जाते. माझ्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बाबींवर मी नेहमीच मौन बाळगले आहे. मी इतकी वर्षे त्या व्यक्तीसोबत घालवली आहेत. त्यामुळे मी काहीही चुकीचे बोलणार नाही. मी फक्त तिला शुभेच्छा देईन. मला खात्री आहे की, आयराची नेहमीच चागली काळजी घेतली जाईल.’



7 वर्ष डेटिंग, लग्न अन् घटस्फोट


आमिर आणि संजीदाची जोडी टीव्ही विश्वात गाजत होती. 2 मार्च 2012 रोजी संजीदा आणि आमिर यांनी लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांना जवळपास 7 वर्षे डेट केले होते. 30 ऑगस्ट 2019 रोजी, दोघांनी सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव त्यांनी आयरा अली ठेवले. या वर्षी जानेवारीमध्ये जोडीने एकमेकांपासून वेगळे होत, घटस्फोट घेतला.


प्रत्येकाने आनंदी राहिले पाहिजे!


आपल्या आयुष्यातील या कठीण प्रवासाचा उल्लेख करताना आमिर (Aamir Ali) म्हणाला, 'एका क्षणी मी खूप हतबल झालो होतो. माझे लग्न मोडल्याने मी कोलमडलो होतो. पण, मी कधीही हार मानली नाही. नेहमीच आनंदी राहिलो आणि मी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात रुळत आहे, याचा मला आनंद आहे. माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट भावना नाहीत. प्रत्येकाने आयुष्यात आनंदी राहिले पाहिजे. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असते.’


 हेही वाचा :


Aamir - Sanjeeda Divorced : आमिर अली आणि संजीदा शेखचा घटस्फोट, लग्नाच्या 9 वर्षानंतर विभक्त