KBC 14 : छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाच्या 14 व्या सिझनची सुरुवात 7 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाली. या सिझनमध्ये खेळाचे काही नियम बदलले आहेत. 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. 14 व्या सिझनमध्ये 75 लाख जिंकणारा दिल्लीमधील आयुष गर्ग (Ayush Garg) हा पहिला स्पर्धक ठरला आहे.
जिंकलेल्या पैशांचा वापर 'या' कामासाठी करणार
अयुष गर्ग हा दिल्लीमध्ये राहतो. एका मुलाखतीमध्ये आयुषनं सांगितलं की, जिंकलेल्या पैशांचा वापर तो एक स्टार्टअप प्रोजेक्टसाठी करणार आहे. या स्टार्टअप प्रोजेक्टमध्ये तो इनव्हेस्ट करणार आहे. 'स्टार्टअप प्रोजेक्टवर मी सध्या काम करत आहे. मी पाहिले आहे की, स्टार्टअप प्रोजेक्टमध्ये पैसे इव्हेस्ट केल्याचा जीवनावर कसा परिणाम होतो. जर तुम्ही स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही खरोखरच काही तरी नवं करु शकता हे माझे एक स्वप्न आहे, जिथे मला माझे स्वतःचे काहीतरी सुरू करायचे आहे. काही वर्षांनी ते पूर्ण होईल,अशी माझी इच्छा आहे.' असं आयुषनं सांगितलं. केबीसीच्या आगामी एपिसोडमध्ये आयुषला एक कोटींचा प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आयुष बरोबर देईला का? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.
पाहा व्हिडीओ:
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय म्हणाला आयुष?
आयुषनं मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांना भेटण्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला की, मला अमिताभ बच्चन यांना भेटून आनंद झाला. बिग बी यांच्याबरोबर प्रत्येक वयातील व्यक्तीला कंफर्टेबल वाटतं. अमिताभ यांनी आयुषला ऑनलाइन डेटिंग बाबत विचारले होते. त्याबाबत आयुष म्हणाला, 'ही नॉर्मल गोष्ट आहे. आमिताभ बच्चन हे असे व्यक्ती आहेत, ज्यांना नव्या गोष्टी शिकायला आवडतात.'
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
KBC 14: 'या' प्रश्नाचं उत्तर देऊन श्रुती डागा जिंकल्या 50 लाख ; तुम्हाला माहित आहे का उत्तर?