Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट आला आहे. मालिकेत सध्या दीपूचा गंभीर अपघात झाला आहे. हा अपघात सानिकामुळे झाला असल्याचे कार्तिक आता इंद्राला मालिकेच्या आगामी भागात सांगणार आहे. सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतला आहे. 


दीपूचा गंभीर अपघात झाल्याने तिची अवस्था पाहून इंद्रा स्वत:ला सावरू शकेल का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. सानिकाचा अपघात कसा झाला हे इंद्राच्या बहिणीने पाहिले आहे. त्यामुळे सानिका किती खोटं बोलते आहे हे तिला चांगलेच माहीत आहे. अशातच दीपूची अवस्था पाहून इंद्रा कार्तिकला चांगलाच दम देतो. त्याले चांगलेच सुनावतो. 


सानिकामुळे दीपूचा अपघात झाल्याचे सत्य अखेर येणार इंद्रासमोर 


सानिका इंद्राच्या भावाची पत्नी असल्याने इंद्रा थेट सानिकासोबत बोलण्याचे टाळतो आणि कार्तिकला सुनावतो. त्यावेळी कार्तिक इंद्राला सानिकासंबंधित सर्व गोष्टी सांगतो. सानिकामुळेच दीपूचा गंभीर अपघात झाला असल्याचे सत्य कार्तिक इंद्राला सांगतो. त्यानंतर देशपांडे सर सानिकाच्या कानाखाली बाजवतात. सानिकाच्या वागणूकीमुळेच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 


सानिकाचं खोटं नाटक दीपूने सांगितलं घरच्यांना


देशपांडे सरांनी सानिकाच्या चोरओटीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमादरम्यान दीपू खूपच नाराज असते. दरम्यान ती इंद्राला सानिका आई होण्याचं नाटक करत असल्याचे सांगते. सानिकाचं हे खोटं नाटक सर्वांसमोर आल्यानंतर आता कार्तिक आणि सानिकाचं नातं तुटणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. सानिकाचं नाटक मालती आणि देशपांडे सरांना समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर इंद्राची आई सानिकाला घरात घेणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : दीपूचा होणार गंभीर अपघात; सानिकाला होईल का बहिणीवरच्या प्रेमाची जाणीव?


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत दीपू-इंद्राचं सत्य येणार सानिका-कार्तिकसमोर?