Filmfare Awads Marathi 2021 : मराठी सिनेसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार सोहळा अर्थात 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा' (Filmfare Awads) नुकताच पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात एबीपी स्टूडिओची सह-निर्माती असलेल्या 'कारखानीसांची वारी' (Karkhanisanchi Waari) या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला आहे. 


'कारखानीसांची वारी' हा सिनेमा 10 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मंगेश जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. मोहन आगाशे, वंदना गुप्ते, अमेय वाघ, प्रदीप वेलणकर, गीतांजली कुलकर्णी आणि शुभांगी गोखले अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. या सिनेमातून एकत्रित कुटुंबाचं भावविश्व उलगडण्यात आलं आहे. इफ्फी , टोकियो फिल्म फेस्टिव्हल सारखे अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल या सिनेमाने गाजवले आहेत.





फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात मंगेश जोशी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार गीतांजली कुलकर्णीला मिळाला आहे. 'कारखानीसांची वारी' या सिनेमाला 'मटा सन्मान पुरस्कार 2022' मध्येदेखील सर्वोत्कृष्ट सिनेमाचे नामांकन मिळाले होते. 


संबंधित बातम्या


Legends of Ramayana : डिस्कव्हरीवर येणार 'लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष'


The Kashmir Files : 'चित्रपटामधून खोटा प्रचार'; शरद पवारांची 'द कश्मीर फाइल्स'वर टीका


RRR Box Office Collection Day 7:पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दिसली ‘आरआरआर’ची जादू, पाहा किती गल्ला जमवला?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha