Tejasswi Prakash,Karan Kundrra : बिग बॉस सिझन 15 (Bigg Boss 15) या कार्यक्रमाची तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही विजेती ठरली.  बिग बॉसच्या या सिझनमध्ये करण कुंद्रा  (Karan Kundrra) आणि तेजस्वीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांची केमिस्ट्री बिग बॉस 15 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. बिग बॉसनंतर देखील करण आणि तेजस्वी हे दोघे त्यांच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहेत. ते दोघे जेव्हा एकत्र डिनरला किंवा शूटिंगला जातात. तेव्हा अनेक फोटोग्राफर्स त्यांचे फोटो काढतात. अनेक वेळा त्यांचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर करण आणि तेजस्वीला फॉलो करतात. त्यामुळे आता करण त्या फोटोग्राफर्सवर भडकला आहे. 


काही दिवसांपूर्वी फोटोग्राफर तेजस्वीच्या घराबाहेर आले होते. तेव्हा फोटोग्राफर तेजस्वीच्या घरामध्ये गेले होते, असं करणनं सांगितलं. याबाबत करण आता फोटग्राफर्सवर भडकला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, करण फोटोग्राफर्स म्हणतो, 'घरातमध्ये घुसू नका. मी माझ्या गाडीच्या काचा देखील काळ्या कलरच्या केल्या आहेत. मला या गोष्टी आवडत नाहित. माझी गर्लफ्रेंड आहे ती, तिच्या घरात घुसू नका. मी सहन करणार नाही. रिस्पेक्ट करा. '






लवकरच तेजस्वी आणि करण अडकणार लग्नबंधनात?
एका मुलाखतीमध्ये तेजस्वीच्या भावानं सांगितलं होतं की, 'तेजस्वी आणि करणच्या नात्याला आमच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे.' तर तेजस्वीच्या वडिलांनी म्हणाले की, 'सर्व काही ठिक झाले तर लवकरच करण आणि तेजस्वीचा विवाह सोहळा पार पडेल. ' त्यामुळे करण आणि तेजस्वी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा आहे.  


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha