Karan Johar Social Media Post : अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून बॉलीवूडमध्ये (Bollywood) ज्याचं नाव घेतलं जातं, तो करण जोहर (Karan Johar) अनेक कारणांमुळे ट्रोल होत असतो. यावर अनेकदा करणने त्याचा संताप व्यक्त देखील केला आहे. पण आता जेव्हा करणला ट्रोल केलं जातं, तेव्हा त्याला राग नाही येत तर त्याला वाईट वाटतं. नुकतच त्याने त्याच्या सोशल मीडियावरुन याबाबत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.       


एका प्रसिद्ध कॉमेडी शोमध्ये करणची मिमिक्री करण्यात आली. तो शो करणने पाहिला आणि त्यावर त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी मला कोणत्याही प्रकारचा राग येण्यापेक्षा मला वाईट वाटलं, अशा भावना करणने व्यक्त केल्यात. सध्या करणची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. 


करणने पोस्टमध्ये काय म्हटलं?


करणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की,मी माझ्या आईसोबत बसून टिव्ही पाहत होतो. तेव्हा मी एका कॉमेडी रिऍलिटी शोचा प्रोमो पाहिला. तो कॉमेडीएन माझी अत्यंत वाईट अशी मिमिक्री करत होता. मी हे ट्रोलर्सकडून आणि ज्यांचं काहीही नावं, चेहरा नाही, अशा लोकांकडून असं वागणं अपेक्षित करु शकतो. पण जेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतली लोकं जो व्यक्ती 25 वर्षांपासून या क्षेत्रात आहे, त्याची खिल्ली उडवतात, तेव्हा वाईट वाटतं. याबद्दल मला अजिबात राग आलेला नाहीये, मला वाईट वाटलंय.


 


कोणी केली करणची मिमिक्री?


सोनी टिव्हीवर येणाऱ्या मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमात अभिनेता आणि कॉमेडीयन केतन सिंहने करण जोहरची मिमिक्री केली आहे. त्याने करणच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाला कॉफी विथ चुरण असं नाव दिलं आहे. या पूर्ण स्किटमध्ये तो करणच्या बोलण्याची आणि डान्सची मिमिक्री करत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान करणच्या स्टार किड्सला लॉन्च करण्याच्या गोष्टीवरही अनेकांनी करणची मज्जा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. 






ही बातमी वाचा : 


IPL 2024 Winner : 'आयपीएल 2024'चा विजेता कोण होणार? राजस्थान, चेन्नई की कोलकाता? 'या' अभिनेत्याने केली भविष्यवाणी