IPL 2024 Winner : 'आयपीएल 2024'चा विजेता (IPL 2024) कोण होणार? असा प्रश्न सध्या प्रत्येक आयपीएलप्रेमी आणि क्रिकेटप्रेमींना पडला आहे. आरआरआर (RRR), सीएसके (CSK) आणि केकेआर (KKR) या तिन्ही टिमचा मोठा चाहतावर्ग आहे. आपलीच टीमने आयपीएलमध्ये (IPL 2024 Winner) बाजी मारावी, असं त्यात्या टीममधील लोकांना वाटत आहे. पण खरं तर जी टीम मैदानात चांगलं खेळेल तिच जिंकेल. 'आयपीएल 2024'च्या विजेत्याबद्दल सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोण चेन्नई सुपरकिंग्सला (सीएसके) चँपियन ठरवत आहे. तर कोण कोलकाता नाइट राइडर्सला (केकेआर). तर कोण राजस्थान रॉयल्सला(आरआरआर) आपला पाठिंबा देत आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षकाने 'आयपीएल 2024'च्या विजेत्याबद्दल आपला अंदाज वर्तवला आहे. 


बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खानने(केआरके) 'आयपीएल 2024'बाबत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये कमाल आर खानने 'आयपीएल 2024'च्या विजेत्याचं नाव जाहीर करत लिहिलं आहे,"आयपीएल 2024 चं प्रेडिक्शन : धोनीने सरेंडर केलं आहे". त्यामुळे आयपीएल 2024 सीएसके जिंकू शकत नाही. त्यामुळे आरआआर किंवा केकेआर 'आयपीएल 2024' जिंकू शकतात". अशाप्रकारे केआरकेने टूर्नामेंटबद्दल आपलं मत मांडलं आहे. खरंतर जी टीम चांगलं खेळेत तिच जिंकेल". कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जाएंटस आयपीएलमध्ये आतापर्यंत चारवेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये लखनौनं तीन वेळा मॅच जिंकली आहे. तर, कोलकातानं एकदा मॅच जिंकली आहे.






शाहरुख खानचा ऑलराउंडर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज! (Andre Russell Bollywood Debut Smriti Mandhana Music)


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान 'आयपीएल 2024'मधील कोलकाता नाइट राइडर्स टीमचा मालक आहे. शाहरुख खान अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. शाहरुखनंतर आता त्याच्या टीममधील ऑलराउंडर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. केकेआर टीमचा खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) याला हिंदी म्युझिक व्हिडीओमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आंद्रे रसेल यांच्या पदार्पणातही क्रिकेट कनेक्शन असणार आहे. आंद्रे रसेल पलाश मुछालच्या म्युझिक व्हिडीओमध्ये काम करणार आहे. पलाश हा भारतीय स्टार क्रिकेटर स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड आहे. म्युझिक दिग्दर्शक असण्यासोबत तो चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळतो.  


संबंधित बातम्या


Ramandeep Singh : रमनदीप सिंगची अफलातून फिल्डींग, रसेल धावत येत असूनही कॅच पकडला, पाच सेकंदाच्या आत करेक्ट कार्यक्रम, पाहा व्हिडीओ