Kapil Sharma And Sunil Grover: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) यांचे चाहते या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. अखेर आता कपिल आणि सुनील यांच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण टीमसोबत एका नवीन शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याची माहिती सुनील आणि कपिलनं एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर आले एकत्र!
नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कपिल म्हणतो,
"नमस्कार, मी कपिल शर्मा". त्यानंतर सुनील म्हणतो, "नमस्कार, मी कोण आहे तुम्हाला माहित आहे." त्यानंतर कपिल म्हणतो, मी नेटफ्लिक्सवर येत आहे. त्यानंतर सुनील म्हणतो, "मी देखील नेटफ्लिक्सवर येत आहे."
पुढे कपिल म्हणतो, "आम्ही दोघे 190 पेक्षा जास्त देशांमध्ये येत आहोत." यावर सुनील म्हणतो, "ऑस्ट्रेलियाला जायला नको" नंर कपिल म्हणतो, "का? सगळे लोक वाट बघत आहेत."त्यावर सुनील म्हणतो, "ठिक आहे, पण बाय एअर नको जायला, बाय रोड जाऊ" व्हिडीओच्या शेवटी कीकू शारदा, अर्चना पूरन सिंह, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकुर हे सर्व दिसतात. त्यानंतर कपिल म्हणतो, "अब हुआ परिवार पुरा"
कपिल आणि सुनीलमध्ये झाला होता वाद
सुनील ग्रोव्हर हा कपिल शर्माच्या "द कपिल शर्मा शो" या कार्यक्रमात काम करत होता. सुनीलनं "द कपिल शर्मा शो" कार्यक्रमात साकारलेल्या गुत्थी या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पण 2017 मध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात वाद झाला होता. कपिल आणि सुनीलमध्ये फ्लाइटमध्ये काही मुद्द्यावरून भांडण झाले होते. तेव्हापासून दोघांनी एकत्र काम करणे बंद केले होते. पण आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या जवान या चित्रपटात सुनीलनं काम केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता सुनीलच्या या आगामी नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
हेही वाचा :