एक्स्प्लोर
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या घरी गूड न्यूज
कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांचा 12 डिसेंबर, 2018 रोजी पंजाबच्या जालंधरमध्ये विवाह झाला होता.

मुंबई : सगळ्यांना आपल्या विनोदांनी मनसोक्त हसवणारा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी लवकरच आनंदाची वार्ता येणार आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांच्या आयुष्यात लवकरच नवा पाहुणा येणार आहे. गिन्नी चतरथ प्रेग्नंट असून डिसेंबर महिन्यात त्यांच्या घरी बाळाचं आगमन होईल, असं समजतं. कपिल सध्या त्याच्या वैवाहिक आणि व्यावसायिक आयुष्यात स्थिर आहे. नव्या पाहुण्याची चाहूल लागल्यानंतर कपिलने त्याच्या शोचं चित्रीकरण अशं निर्धारित केलं आहे, जेणेकरुन तो गिन्नीला वेळ देऊ शकेल, तिची काळजी घेऊ शकेल. शिवाय गिन्नी चतरथही चित्रीकरणाच्या वेळी कपिल शर्मासोबत असते. सेटवर कपिलचे सहकारी गिन्नीची काळजी घेतात. कपिल आणि गिन्नीचं हे पहिलं अपत्य असेल. या गूड न्यूजनंतर कपिलची आई तसंच गिन्नीचे आई-वडीलही जालंधरहून मुंबईत पोहोचले आहेत. कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांचा 12 डिसेंबर, 2018 रोजी पंजाबच्या जालंधरमध्ये विवाह झाला होता. तर त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन अमृतसर, मुंबई आणि दिल्लीमध्ये झालं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
टेलिव्हिजन
टेलिव्हिजन
टेलिव्हिजन

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















