Khatron Ke Khiladi 12: दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी 12 (Khatron Ke Khiladi 12) चा ग्रँड फिनाले काही दिवसांपूर्वी पार पडला. रुबीना दिलैक (Rubina Dilaik), फैजल शेख (Faisal Shaikh) जन्नत जुबैर (Jannat Zubair), तुषार कालिया (Tushar Kalia) आणि मोहित मलिक हे या सिझनचे टॉप-5 स्पर्धक होते. तुषारनं हा शो जिंकला आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता सध्या या स्पर्धेतील कनिका मान (Kanika Mann) ही स्पर्धक सध्या चर्चेत आहे. कनिकानं खतरों के खिलाडी 12 च्या निर्मात्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. जाणून घेऊयात या प्रकरणाबाबत... 

Continues below advertisement

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरु आहे की,  कलर्स चॅनल आणि  खतरों के खिलाडी 12 च्या निर्मात्यांशी कनिका मानचा वाद झाला आहे. तिनं निर्माते आणि कलर्स चॅनलवर आरोप केला आहे की, टीव्हीवर तिची नकारात्मक प्रतिमा दाखवली जात आहे.  याबाबत किनकानं आणि त्याच प्रमाणे कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.   

Continues below advertisement

25 सप्टेंबर 2022 रोजी 'खतरों के खिलाडी 12' चा ग्रँड फिनाले पार पडला. या ग्रँड फिनालेला कनिका मान सोडून सर्व स्पर्धकांनी उपस्थिती लावली. तिने यापूर्वी एका मुलाखतीत असेही सांगितले होते की, ती फिनालेला येणार नाही, कारण ती दुसऱ्या कमात व्यस्त होती. खतरों के खिलाडी 12 च्या एका एपिसोडमध्ये कनिकाचं रुबिनासोबत भांडण झालं होतं. तर  एका एपिसोडमध्ये कनिकाला रोहित शेट्टीनं सुनावलं होतं.  

कनिका मानला 'बॅरिस्टर बाबू' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. तसेच गुड्डन तुमसे ना हो पायेगा या मालिकेमध्ये देखील कनिकानं काम केलं आहे. कनिकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. 'खतरों के खिलाडी 12 या शोमध्ये कनिकासोबतच रुबीना दिलैक, मोहित मलिक, प्रतीक सहजपाल, शिवांगी जोशी, कोरिओग्राफर तुषार कालिया या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :