Kanika Mann Injured : लवकरच  खतरों के खिलाडी 12 (Khatron Ke Khiladi 12) हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक  रोहित शेट्टी (Rohit Shetty) करतो. अनेक सेलिब्रिटी खतरों के खिलाडी या शोमध्ये सहभाग घेऊन वेगवेगळे स्टंट करतात.  खतरों के खिलाडी 12 मध्ये कनिका मान ही अभिनेत्री सहभागी होणार आहे. तिला स्टंट करताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अफ्रीकेमधील केप टाउनमध्ये सध्या खतरों के खिलाडी 12 चे शूटिंग सुरु आहे. कनिकाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कनिकाच्या शरीरावर जखमा झालेल्या दिसत आहेत. 


कनिकानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की,  खतरों के खिलाडी या शोमधील एका टास्क दरम्यान कनिकाला दुखापत झाली. ती म्हणाली,'मी तो टास्क पूर्ण केला. पण मला दुखापत झाली. मी रोहित शेट्टी सरांना सांगितलं की, मी माझा हात आणि पाय हलवू शकत नव्हाते. ते मला म्हणाले की, लोकांना तू स्ट्रॉन्ग खिलाडी आहेस ,असे वाटेल. त्यामुळे काळजी करु नको. '


कुटुंबाला पाठवला फोटो 
कनिकानं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझ्या जखमांचा फोटो मी माझ्या कुटुंबाला पाठवला आणि मी त्यांना म्हणाले या जखमा माझी नवी ज्वेलरी आहे. मी माझ्या जखमा फ्लॉन्ट करत आहे.' फोटोमधील कनिकाला झालेल्या जखमा पाहून तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. 






'खतरों के खिलाडी 12 या शोमध्ये कनिकासोबतच रुबीना दिलैक, मोहित मलिक, प्रतीक सहजपाल, शिवांगी जोशी हे सेलिब्रिटी देखील सहभागी होणार आहे. कोरिओग्राफर तुषार कालिया, सृती झा हे देखील या शोमध्ये भाग घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे.  कनिका मानला 'बॅरिस्टर बाबू' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. तसेच गुड्डन तुमसे ना हो पायेगा या मालिकेमध्ये देखील कनिकानं काम केलं आहे. 


हेही वाचा :