एक्स्प्लोर

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी 'संभाजी' ही नवी मालिका 24 सप्टेंबरपासून झी मराठीवर रसिकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून 'झी मराठी' वाहिनीवर गाजणारी शिव-गौरीची 'काहे दिया परदेस' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 27 सप्टेंबरपासून 'संभाजी' ही ऐतिहासिक मालिका 'काहे दिया...' ऐवजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रक्षेपित होईल. महाराष्ट्राची लेक गौरी आणि वाराणसीचा छोरा शिव यांची प्रेमकथा असलेल्या 'काहे दिया परदेस' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली होती. सायली संजीवने यात गौरीची, तर रिषी सक्सेनाने यामध्ये शिव ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्याशिवाय दिग्गज अभिनेते मोहन जोशी, शुभांगी गोखले या मालिकेत प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. गेल्या वर्षी झालेल्या प्रेक्षक पसंतीच्या 'झी मराठी पुरस्कारां'मध्ये काहे दिया परदेसने सर्वोत्कृष्ट मालिकेसह अनेक मुख्य पुरस्कार खिशात घातले होते. त्यामुळे या मालिकेचा सर्वत्र बोलबाला होता. 'काहे दिया..'च्या अखेरच्या भागाबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, सम्राट अशोक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महाराणा प्रताप यासारख्या अनेक महापुरुषांच्या गाथा हिंदी आणि मराठी भाषेत मालिका रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी 'संभाजी' ही नवी मालिका 24 सप्टेंबरपासून झी मराठीवर रसिकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून छत्रपती संभाजी राजे यांची शौर्यगाथा रसिकांना अनुभवता येणार आहे. अभिनेता अमोल कोल्हे या मालिकेत संभाजींची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी शंभूराजे नाटकात त्यांनी संभाजी राजेंची भूमिका साकारल्यामुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. अभिनेता शंतनू मोघे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून प्रख्यात अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. 24 सप्टेंबर रोजी संभाजी मालिकेचा दोन तासांचा पहिला भाग प्रक्षेपित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Krushnaichya Leki Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी

व्हिडीओ

Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget