Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात नुकताच बीबी करन्सीसाठी टास्क पार पडला. यामध्ये सदस्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. टीम A आणि टीम B मध्ये फुल ऑन बाचाबाची झाली. यावेळी जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली. जान्हवीने पॅडीबद्दल लाजिरवाणं भाष्य केलं. पॅडीवर टीका करताना जान्हवीने पातळी सोडली, यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. नेटकऱ्यांनी जान्हवीला चांगलंच निशाण्यावर धरलं आहे. टीकांचा भडीमार सहन करणाऱ्या जान्हवीसाठी आता नवरा मैदानात उतरला आहे. (Jahnavi Insult Paddy Kamble in Bigg Boss Marathi Season 5)


ट्रोलर्सच्या निशाण्यावर असणाऱ्या जान्हवीसाठी नवरा मैदानात


पॅडीबाबत (Paddy Kamble) लाजिरवाणं भाष्य केल्यानंतर जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) हिच्यावर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरु आहे. त्यानंतर आत जान्हवीसाठी नवरा मैदानात उतरला आहे. ट्रोलर्सने निशाण्यावर धरल्यानंतर जान्हवीच्या पतीची प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉस मराठी घरातील घडामोडींवर जान्हवी किल्लेकरच्या पतीने अधिकृत निवेदन जारी केलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त घटनांवर, जान्हवी किल्लेकरच्या पतीने यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


जान्हवीचा पती किरण किल्लेकरनं नेमकं काय म्हटलंय?


जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करियर बद्दल बोलण योग्य नाही पण जेव्हा हे घडल तेव्हा चे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली. याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे, ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचे घर साधं घर नाही, तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील, असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत, असंही नाही. तिथे गेल्या नंतर लोक बदलतात, त्यांचे वागण्याची पद्धत बदलते, याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही. 


लोकांनी उगच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकीचे सदस्य बोलतात, ते सगळं बरोबर. जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी ह्या बाईचा एक दिवस पाण उतारा करीन. अंकिता बोलते, हिच्या मध्येच खूप खोडी आहेत, अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात, कॅमरा आपल्याकडे आहे, नका बोलू, तेव्हा कुठे गेलेले आदर्श तेव्हा वर्षा ताई सिनियर नव्हत्या म्हणजे?


जर जान्हवी बोलली, तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले, पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची ते सेवा करते. ते फक्त फुटेजसाठी असतात, असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा 24 तासाच्या प्रवासात काय-काय घडत आपल्याला याची माहिती नसते, ती एक तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका. बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देत याचा पण विचार करा. बसं, बोलायला खूप आहे, पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक माझ्या या विषयाला आता आगे सारखं पसरवतील आणि काही तरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो. मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळू हळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी.


पॅडीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जान्हवीची नवऱ्याकडून पाठराखण




जान्हवीचं पॅडीच्या करिअरबाबत लाजिरवाणं वक्तव्य


बिग बॉस मराठीच्या घरात बीबी करन्सीसाठी 'सत्याचा पंचनामा' टास्क पार पडला. टास्कच्या  ब्रेक दरम्यान जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेच्या करिअरबाबत लाजिरवाणं वक्तव्य केलं. जान्हवीने म्हणाली की, 'हे सर्व लोक घाणेरडे आहेत,  समोर येऊन बोलण्याचा दम नाहीये. यांना फक्त अ‍ॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले म्हणून ती अ‍ॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.' यानंतर आर्या जान्हवीला टोकते, पण ती तिलाही हड-तूडची भाषा करते.