Irina Rudakova Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) जाणाऱ्या स्पर्धकांविषयी कायमच प्रेक्षकांच्या मनामध्ये कुतूहल असतं. यातले बरचसे कलाकार हे ओळखीचे असतात तर काहींची नव्याने ओळख होते. बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन काहीच दिवसांपूर्वी सुरु झाला. त्यामध्ये एका स्पर्धकाने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं. ती स्पर्धक म्हणजेच परदेसी गर्ल म्हणून घरात सहभागी झालेली इरीना रुडाकोव्हा. 


इरीने नुकताच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. इरीना ही मुळची युक्रेनची आहे. तिचे वडील हे सैन्यात होते. पण सध्या सुरु असलेल्या युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये तिचे वडील शहीद झाले. त्यानंतर भारतात येऊन तिने तिच्या कुटुंबाचा सांभाळ केला. 


वडील सैन्यात, कुटुंबाचा सांभाळ


इरीनाने एबीपी माझासोबत बोलताना सांगितलं की, 'माझे वडील सैन्यात होते. पण गेल्या वर्षी युक्रेन रशियाच्या युद्धात माझे वडील शहीद झाले. त्यानंतर जवळपास महिनाभर मी माझ्या आईसोबत राहिले. त्यानंतर मला भारतातून कामासाठी फोन आला. तेव्हा मी माझ्या आईला विचारलं की, तू भावासोबत राहशील ना? कारण आता मला तुमच्या पाठिशी उभं राहायचं आहे. माझ्या भावाला 4 मुलं आहे. युद्धामुळे कोणतंही काम सुरु नाही. त्यामुळे मला भारतात येऊन पुन्हा काम सुरु करण्याची गरज होती. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी पुन्हा भारतात आले. तेव्हापासून मी एकही दिवस सुट्टीही घेतली नाही. प्रमोशन्स असोत, डान्सचे कार्यक्रम असोत, रॅम्प वॉक, मॉडेलिंग अशी सगळी कामं मी केलीत.' 


इरीना मराठी कशी शिकली?


तू मराठी कशी शिकलीस या प्रश्नाचं उत्तर देताना इरीनाने म्हटलं की, मी मुंबईमुळे मराठी शिकले. त्यानंतर रितेश सर जे काही प्रश्न विचारायचे त्याची मी उत्तर द्यायचे. बिग बॉससोबत मराठीत बोलायचे.मी ज्यांच्याकडून मराठी शिकले त्यांच्यामुळेही बऱ्यापैकी मराठी यायला लागलं. वैभवनेही मला मराठी शिकवलं.


बिग बॉसच्या घरात मराठी माणूस नाही - इरीना


मला असं ठाम वाटतं की, बिग बॉस मराठीच्या घरातमध्ये मराठी माणूस नाही. माझ्या या मताचं अनेकांना वाईट वाटेल. त्यासाठी मी माफीही मागते, पण तिथे दोन ते तीन जणं सोडलीत तर मराठी माणूस नाही. वैभव कदाचित थोडं चुकला असेल पण वैभव उत्तम माणूस आहे. दुसरा तिथे मराठी माणूस कुणी असेल तर तो सूरज आहे. धनंजय दादाही मराठी माणूस आहे. त्यांनी मला कोल्हापुरीही शिकवली.


मला निक्की पहिल्या दिवसापासून आवडली नाही - इरीना


मला तिथे माझ्यावर भावनांवर फार नियंत्रण ठेवावं लागलं. मी असं नाहीये की, त्यांच्याशी भांडू शकत नाही पण मला काही लोकं नाही पटत. मला आर्या अजिबात आवडली नाही. मला निक्कीही अजिबात आवडत नव्हती. पहिल्या दिवसापासूनच मला ती पटत नव्हती. मला तिचा आवाजाचा खूप त्रास व्हायचा, असं म्हणत घरातीलही गोष्टी इरीनाने सांगितल्या आहेत.   



ही बातमी वाचा : 


Mirzapur 3 Bonus Episode : कसा पाहता येणार 'मिर्झापूर'चा बोनस एपिसोड? फक्त 'या' स्टेप्स करा फॉलो