Mirzapur 3 Bonus Episode: मिर्झापूर (Mirzapur 3) ही सिरिज पहिल्याच सिझनपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आली आहे. नुकतच या सिरिजचा तिसरा सिझनही प्रदर्शित झाला होता. पण या सिझनमध्ये प्रेक्षकांनी मुन्ना भैय्याला खूप मिस केलं. तसेच त्याच्या नसण्यावर नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे तिसरा सिझन जरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असला तरीही मुन्नाभैय्या नसल्यामुळे अनेकांनी या सिझनकडे पाठ फिरवली. 


प्रेक्षकांची हीच नाराजी लक्षात घेता आता निर्मात्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मुन्ना भैय्यासाठी मिर्झापूर 3 चा बोनस एपिसोड येणार आहे. ज्याचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. त्यामुळे मिर्झापूरच्या चौथ्या सिझनमध्ये मुन्ना भैय्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जवळपास निश्चितच झालंय. 


मिर्झापूरचा बोनस एपिसोड


दरम्यान आजच म्हणजे 30 ऑगस्ट रोजी मिर्झापूरचा बोनस एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण हा एपिसोड तुम्हाला कुठे आणि कसा पाहता येईल त्याचप्रमाणे हा एपिसोड पाहण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


असा डोऊनलोड करा मिर्झापूरचा बोनस एपिसोड


मिर्झापूर 3 चा बोनस एपिसोड प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. तो कसा डाऊनलोड करुन घ्यायचा ते जाणून घेऊया. 


1- मिर्झापूर 3 चा बोनस एपिसोड पाहण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला Amazon Prime चे सबस्क्रिप्शन आवश्यक असेल.


2- तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.


3- मिर्झापूर 3 च्या बोनस भागावर क्लिक करा. त्यानंतर डाउनलोड बटणावर क्लिक करा आणि डाउनलोड करा.


4- बोनस भाग फुल एचडी स्वरूपात डाउनलोड केले जाऊ शकतात. डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कधीही, कुठेही हा भाग पाहू शकता.


मिर्झापूर 3 मध्ये पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, अली फजल, विजय वर्मा आणि रसिका दुग्गल महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.


मिर्झापूर सीझन 3 बोनस एपिसोड रिलीज डेट


निर्माते  आता मिर्झापूर सीझन 3 चा बोनस एपिसोड घेऊन येत आहेत. या बोनस एपिसोडमध्ये 'मिर्झापूर वेब सीरीजमधील प्रसिद्ध पात्र मुन्ना भैय्याची कथा दाखवण्यात येणार असल्याचं प्रोमोवरून स्पष्ट झालं आहे. यासोबतच त्याच्या टीझरमध्ये बोनस एपिसोडच्या रिलीज डेटची माहितीही देण्यात आली आहे. 'मिर्झापूर सीझन 3' चा बोनस एपिसोड प्राइम व्हिडीओवर 30 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होतील.


ही बातमी वाचा : 


Abhijeet Sawant : पहिल्या 'इंडियन आयडॉल' विनरला मराठी सिनेसृष्टीने नाकारलं? अभिजीत सावंतने सांगितले 'त्या' काळातील अनुभव