Indian Idol 13: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'चा 13 वा (Indian Idol 13) सीझन सुरू झाला आहे. या कार्यक्रमामधील स्पर्धकांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच या कार्यक्रमाच्या स्पर्धकांनी केवळ सामान्य लोकांची नाही तर सेलिब्रिटींची देखील मनं जिंकली आहेत. शनिवारी (8 ऑक्टोबर) एका एपिसोड दरम्यान कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणनं स्पर्धक ऋषी सिंहला (Rishi Singh) क्रिकेटर विराट कोहलीनं (Virat Kohli) केलेल्या खास मेसेजबाबत सांगितलं.


विराट झाला ऋषीचा चाहता


आयोध्याचा असलेला ऋषी हा त्याच्या गाण्यानं नेहमीच  'इंडियन आयडॉल'च्या परीक्षकांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकतो.  केसरिया या गाण्यामुळे ऋषीला विशेष लोकप्रियता मिळाली. ऋषीला नुकताच विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर एक खास मेसेज केला. विराटनं मेसेजमध्ये लिहिलं, 'हाय, ऋषी कसा आहेस? मी तुझ्या गाण्यांचे काही व्हिडीओ पाहिले. मला तुझं गाणं खूप आवडलं. तुला शुभेच्छा.' यावर ऋषीनं रिप्लाय दिला, 'थँक्यू सर'


विराटनं ऋषीला इन्स्टाग्रामवर केलं फॉलो


विराट कोहलीने ऋषींना इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे. विराट कोहलीला इंस्टाग्रामवर 216 मिलियन नेटकरी फॉलो करतात. विराट कोहली फक्त 255 लोकांना फॉलो करतो, ज्यामध्ये ऋषी सिंह देखील सामील झाला आहे.






'इंडियन आयडॉल' चे टॉप 15 स्पर्धक


ऋषीसोबतच शिवम सिंह, शगुन पाठक, चिराग कोटवाल, देवोष्मिता रॉय, सेंजुती दास, रुपम भरनारिया, विनीत सिंह, अनुष्का पात्रा, बिदिप्ता चक्रवर्ती, प्रीतम रॉय, संचारी सेनगुप्ता, सोनाक्षी कर, काव्या लिमये, नवदीप वडाली हे 'इंडियन आयडॉल' चे टॉप-15 स्पर्धक आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Indian Idol : चित्रपट झाले आता नेटकरी करतायत 'बॉयकॉट' इंडियन आयडॉलची मागणी! नेमकं कारण तरी काय?