Bigg Boss 16 Promo:  'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचा पहिला 'वीकेंड का वार' हा काल (8 ऑक्टोबर) पार पडला आहे. पहिल्या वीकेंडला सलमान खान (Salman Khan) स्पर्धकांसोबत  वेळ घालवताना दिसून आला आहे. सलमाननं  ‘शनिवार का वार' मध्ये स्पर्धकांना काही सुचना देखील दिल्या. आता या कार्यक्रमाच्या 'रविवार का वार' या एपिसोडमध्ये एका सेलिब्रिटीची एन्ट्री होणार आहे. हा सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची पोलखोल करताना दिसणार आहे. 


प्रोमो व्हायरल 


नुकताच कलर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये चेहऱ्यावर मास्क घातलेली एक व्यक्ती दिसत आहे. मास्क काढल्यानंतर दिसते की बिग बॉसच्या 'रविवार का वार' या एपिसोडमध्ये  गायक, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता असणारे शेखर सुमन हे एन्ट्री करणार आहेत. या प्रोमोला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'मुव्ह अँड शेक विथ शेखर सुमनमध्ये सर्व स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील मुखवटे काढले जाणार.'


बिग बॉसचा ‘रविवार का वार’  हा एपिसोड शेखर सुमन हे होस्ट करणार आहेत, असा अंदाज प्रोमो पाहून लावला जाऊ शकतो. या एपिसोडमध्ये स्पर्धांकाना काही टास्क देऊ शकतात. आता शेखर सुमन यांची एन्ट्री झाल्यानं बिग बॉसच्या घरात अडचणी निर्माण होतील की नाही? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 






अब्दू, निमृत कौर, गौतम, शालीन, सुंबुल, टीना, सौंदर्या, एससी स्टेन, साजिद खान आणि शिव ठाकरे या स्पर्धकांनी बिग बॉस-16 मध्ये सहभाग घेतला आहे. हे स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतात. तसेच विविध टास्क देखील खेळतात. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Bigg Boss 16 : सलमान खानने घरातील स्पर्धकांना दिली पार्टी; मान्या-श्रीजितामध्ये जोरदार भांडण