Chatur Chor : हॉरर कॉमेडीला सध्या प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही कॉमेडीची जागा अद्याप कोणीही घेतली नाही, तसेच काहीसे चित्रपटांच्या बाबतीतही आहे. हॉरर कॉमेडी म्हटलं की, हॉरर आणि कॉमेडी दोन्हीकडील प्रेक्षक वर्ग हा एक होऊन चित्रपटास योग्य तो न्याय देतो. लवकरच एक नवा कोरा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे पार पडले आहे. तगड्या स्टारकास्टचा हा चित्रपट असून, या चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi), अभिनेत्री प्रीतम कागणे (Pritam Kagane), अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे कलाकार झळकणार आहेत.

Continues below advertisement

हार्दिक, प्रीतम आणि अक्षयाने या चित्रपटात काय हॉरर कॉमेडी केलीय हे पाहणं विशेष रंजक ठरणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर पेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राची लाडकी जोडी, ‘पाठक बाई-राणादा’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा पोस्टर :

Continues below advertisement

अक्षया-हार्दिकची जोडी झळकणार!

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. या मालिकेनंतर आता त्यांचा नवा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. हार्दिक, अक्षयानं पुन्हा एकत्र काम करण्याची चाहत्यांची इच्छा ‘चतुर चोर’ या चित्रपटामुळे पूर्ण होणार आहे. या चित्रपटात हार्दिक आणि अक्षया प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. नावापासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या या चित्रपटातून हार्दिक आणि अक्षया पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र येणार असल्याने या चित्रपटाविषयीचं कुतूहल अधिकच वाढलं आहे हे नक्की!

कोण असणार ‘चतुर चोर’?

या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी पेलवली असून, सहनिर्माते म्हणून तबरेज पटेल आणि निनाद भट्टीन यांनी बाजू सांभाळली आहे. तर दिग्दर्शक आणि छायाचित्रकार अमोल गोळे यांनी या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे. तर चित्रपटाची कथा लेखक सुमित संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. आता या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, हार्दिक, प्रीतम, अक्षयासोबत इतर कोणते कलाकार या सिनेमात झळकणार, हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.

लंडनमध्ये चित्रित झालेल्या या हॉरर कॉमेडी 'चतुर चोर' मधला चतुर चोर नेमका कोण असेल, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

हेही वाचा:

Akshaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

Akshaya - Hardik Engaged : अखेर राणा दा अन् अंजली बाईंचं जमलं; अक्षया-हार्दिकने गुपचूप उरकला साखरपुडा