Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी आणि कानडी भाषिक प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत गावात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरले अप्पा आणि तात्या यांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार म्हणजे विद्याधर जोशी आणि अतुल काळे. यांच्यात पुन्हा एकदा चुरस रंगणार आहे. झेंडावंदन कार्यक्रमाला ध्वजारोहण करण्याचा मान कोणाला मिळणार यावरून भांडण सुरू असतं. गावासमोर सुरू असलेलं हे भांडण काही केल्या संपत नाही, त्या वेळी ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार हे गावचे पुढारी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आलेले असतात. त्यावेळी गावचे ज्येष्ठ पुढारी आणि जगविख्यात शास्त्रज्ञ भास्कर आनंद हे ध्वजारोहन कार्यक्रमासाठी आलेले असतात.
मालिकेत भास्कर आनंद यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दारांची दिमाखदार एन्ट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता गावचे पुढारी आणि ज्येष्ठ या अधिकाराने ते हे भांडण सोडवतील का? ध्वजारोहण कोण करणार यावर तोडगा निघेल का, हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.
विद्याधर जोशी आणि अतुल काळे या जोडगोळीचं ऑनस्क्रीन भांडण आणि भाषेपलीकडचं प्रेम सोनी मराठी वाहिनीवरली 'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोमवार ते शनिवार संध्या. 7.30 वा. प्रेक्षक सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षक ही मालिका पाहू शकतात.
जिवाची होतिया काहिली
कुठे पाहायला मिळेल? सोनी मराठी
किती वाजता? सोम.-शनि. संध्या. 7:30 वा.
संबंधित बातम्या