Akshaya - Hardik : 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat jeev Rangla) मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईंच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्दिक जोशी (hardeek joshi) आणि अक्षया देवधरचा (Akshaya Deodhar) नुकताच साखरपुडा पार पडला आहे.सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला असला तरी राणा दा आणि अंजलीबाईंसाठीचं प्रेक्षकांचं प्रेम कमी झालेलं नाही. आता प्रेक्षक त्यांच्या लग्नसोहळ्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.





शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेल्या अंजली बाईंची प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. आता वैयक्तिक आयुष्यात ते सार फेरे घेणार असल्याने चाहते आनंदीत झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोवर चाहते आणि कलाकार अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 


संबंधित बातम्या


Akshaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार


In Pics : 'तुझ्यात जीव रंगला' म्हणत राणा दा अंजली बाईंनी उरकला साखरपुडा


Prajakta Mali : आज 3 तारीख... राज ठाकरेंसंबंधित प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल