Taarak Mehta Ka ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka ooltah Chashmah)या  मालिकेतील 'नट्टू काका' (Nattu Kaka)ही भूमिका साकारणारे अभिनेते ​​घनश्याम नायक यांच्या निधनाला नऊ महिने पूर्ण झाले. मालिकेचे चाहते आता 'नट्टू काका' या भूमिकेला खूप मिस करत आहेत.  लवकरच 'नट्टू काका' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गुजराती चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते किरण भट्ट (Kiran Bhatt)आता या शोमध्ये नट्टू काकांची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका मुलाखतीमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कार्यक्रमाचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनी  किरण भट्ट यांच्याबाबत सांगितलं. 


असित मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, किरण भट्ट हे नट्टू काका ही भूमिका साकारणार आहे. ते खूप आनंदी आणि उत्साही व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांची निवड नट्टू काका या भूमिकेसाठी करण्यात आली. असित मोदी यांनी सांगितले की, 'मी थिएटर करत होतो, त्या दिवसांमध्ये किरण भट्ट हे  माझे निर्माता होते. ते या शोमध्ये सहभागी झाले आहेत, या गोष्टीचा मला आनंद वाटतो.' 


'तारक मेहता शोमधील सर्व भूमिका या वेगळ्या आणि यूनिक आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही  भूमिकेची  रिप्लेसमेंट शोधणे हे अवघड काम असते. नट्टू काका ही देखील  अशीच भूमिका होती, त्यामुळे या भूमिकेची रिप्लेसमेंट शोधण्यात खूप अडचणी आल्या. कारण तारक मेहताच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. बरेच प्रेक्षक अजूनही या कार्यक्रमाचे रिपीट टेलिकास्ट पाहतात.', असही असित मोदी म्हणाले. 



असित मोदी म्हणाले की, 'किरण भट्ट हे गुजराती रंगभूमीवरील कलाकार आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली आहे.  त्यांची कॉमिक टायमिंग चांगली आहे. नट्टू काकांच्या व्यक्तिरेखेसाठी अशा कलाकाराचा शोध सुरू होता जो पडद्यावर जुन्या अभिनेत्याची कॉपी करणार नाही.'


28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.



हेही वाचा: