Gurucharan Singh Missing : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेता गुरचरण सिंग (Gurucharan Singh) याच्या बेपत्ता होण्याचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललं आहे. रोज काही ना काही नवा खुलासा या प्रकरणात होतोय. अलीकडील अहवालात असे दिसून आले की,  तो 10 बँक खाती आणि अनेक ईमेल खाती वापरत होता.  कारण त्याला संशय आला की कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवत आहे. दुसरीकडे, त्याचे वडील हरजीत सिंग यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या मुलाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती नाही. आता अभिनेत्याच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त वडील हरजीत सिंग यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यांचा मुलगा घरी नक्की परत येणार असा विश्वास देखील व्यक्त केलाय. 


जाण्यापूर्वी गुरुचरण सिंग याचा त्याचा वडिलांशी काय संवाद झाला याविषयी त्याच्या वडिलांनीच सांगितले आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, त्यांनी म्हटलं की, तो माझ्या वाढदिवसादिवशी म्हणजे 21 एप्रिल रोजी इथे होता आणि दुसऱ्या दिवशी त्याला मुंबईला जायचं होतं. त्यावेळी तो मला म्हणाला होता की, मी 1 ते 2 दिवसांत परत येईन. पण त्यानंतर काय झालं आम्हाला माहित नाही. काहीच कळालं नाही. गुरुचरणला कसली काळजी होती का? यावर बोलताना त्याच्या वडिलांनी म्हटलं की, तो काळजीत दिसत होता, पण त्याने कधीच त्याबद्दल सांगितलं नाही. 


पोलिसांकडून तपास सुरु


दरम्यान, तपासाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने डेक्कन हेराल्डला सांगितले की, गुरुचरण सिंगला कोणीतरी आपल्यावर 'नजर' ठेवत असल्याचा संशय होता आणि त्यामुळे तो वारंवार आपले ईमेल खाते बदलत होता. असे सांगण्यात येत आहे की , अभिनेता 27 भिन्न ईमेल खाते वापरत होता. दरम्यान त्याच्या आर्थिक स्थितीचा देखील आढावा पोलिसांकडून घेण्यात आला आहे. 


गुरुचरणने कोणाशी साधला होता शेवटचा संवाद


त्यातच एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, गुरुचरणला भीती वाटत असल्याने तो 27 पेक्षा जास्त ईमेल आयडी आणि बँकेचे अकाऊंट्स वापरत होता. इतकच नव्हे तर त्याच्याकडे दोन मोबाईल देखील होते. त्यातील एक फोन त्याने घरीच ठेवला होता तर दुसरा फोन तो वापरत होता. पोलिसांनी तपासादरम्यान त्याचे कॉल रेकॉर्ड्स देखील तपासले. तेव्हा अशा लक्षात आलं की, त्याने शेवटचा कॉल हा त्याच्या एका मित्राला केला होता. त्याचा हा मित्र मुंबईत राहणारा आहे. 


ही बातमी वाचा : 


Gurucharan Singh Missing : 'तारक मेहता'च्या सेटवर दिल्ली पोलीस, सहकलाकारांना विचारले प्रश्न; गुरुचरण बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट