Gurucharan Singh Missing :  'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) मागील 20 दिवसांपासून बेपत्ता आहे. गुरुचरण 22 एप्रिल रोजी मुंबईला जाणार होता. त्यासाठी तो दिल्ली विमानतळासाठी घरातून निघाला देखील पण तो मुंबईत पोहचलाच नाही. अखेर 26 एप्रिल रोजी त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. त्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर सध्या दिल्ली पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. त्यातच पुन्हा एकदा पोलिसांकडून त्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर हजेरी लावली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. 


 न्यूज 18 च्या वृत्तानुसार, गुरुचरणचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. त्याच चौकशीसाठी मुंबई गोरेगाव फिल्मसीटीमध्ये असलेल्या तारक मेहताच्या सेटवर दिल्ली पोलिसांनी हजेरी लावली.  काही दिवसांपूर्वी त्याचे 10 बँकेत खाती असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यामुळे संशय आणखी बळावत गेला. त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांना त्याच्या संदर्भात काही संशयास्पद माहिती मिळाली आहे. पीटाआयच्या वृत्तानुसार, गुरुचरणला कोणत्यातरी गोष्टीची भीती वाटत होती. त्याला सतत असं वाटत होतं की, कुणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे तो तब्बल 27 मेल आयडी वापरत असल्याची माहिती आता समोर आली आहे. 


गुरुचरणने कोणाशी साधला होता शेवटचा संवाद


त्यातच एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, गुरुचरणला भीती वाटत असल्याने तो 27 पेक्षा जास्त ईमेल आयडी आणि बँकेचे अकाऊंट्स वापरत होता. इतकच नव्हे तर त्याच्याकडे दोन मोबाईल देखील होते. त्यातील एक फोन त्याने घरीच ठेवला होता तर दुसरा फोन तो वापरत होता. पोलिसांनी तपासादरम्यान त्याचे कॉल रेकॉर्ड्स देखील तपासले. तेव्हा अशा लक्षात आलं की, त्याने शेवटचा कॉल हा त्याच्या एका मित्राला केला होता. त्याचा हा मित्र मुंबईत राहणारा आहे. 


गुरुचरणच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देखील समोर


इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, गुरुचरणच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देखील पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार, ज्या दिवशी गुरुचरण बेपत्ता झाला त्या दिवशी त्याने त्याच्या बँकेच्या खात्यातून 14 हजार रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील फारशी बरी नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे गुरुचरणच्या बेपत्ता होण्यामागे नेमकी कोणती कारण आहेत याचा शोध सध्या दिल्ली पोलीस घेतायत. 


ही बातमी वाचा : 


Salman Khan : सलमान खानला विचारण्यात आलेला ऐश्वर्या रायबद्दल प्रश्न; सोशल मीडियावर व्हायरल होतंय भाईजानचं उत्तर