Gum Hai Kisi Key Pyaar Meiin Serial Latest Update : 'गुम हैं किसी के प्यार में' (Gum Hai Kisi Key Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सर्वच वयोगटातील मंडळींना ही मालिका आवडते. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असून या मालिकेसंदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता या मालिकेत एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) यांचं कमबॅक होणार आहे. याआधीदेखील मालिकेच्या एका भागात रेखा दिसल्या होत्या. आता टीआरपीच्या कारणाने निर्मात्यांनी पुन्हा एकदा रेखा यांना मालिकेसाठी विचारणा केली आहे.


'गुम हैं किसी के प्यार में' या मालिकेतील नाट्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या लोकप्रिय मालिकेत बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री होणार आहे. रेखा यांच्या कमबॅकची बातमी ऐकताच त्यांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


'गुम हैं किसी के प्यार में' मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री


'गुम हैं किसी के प्यार में' मालिकेच्या आगामी भागात बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री होणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून रेखा स्टारप्लससोबत तिसऱ्यांदा काम करणार आहेत. अवघ्या विश्वाला आपल्या सौंदर्याने मोहित करणाऱ्या रेखा यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.






'गुम हैं किसी के प्यार में' या मालिकेच्या आगामी भागात अनेक ट्विस्ट आणि रंजक वळणे येणार आहेत. 'गुम हैं किसी के प्यार में' या मालिकेत लीप येणार आहे. त्यामुळे रेखा या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. पण त्या नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप समोर आलेलं नाही. 


'गुम हैं किसी के प्यार में' मालिकेबद्दल जाणून घ्या...


'गुम हैं किसी के प्यार में' या मालिकेची निर्मिती राजेश राम सिंह, पिया बाजपेयी, प्रदीप कुमार आणि शायका परवीन यांनी केली आहे. ही मालिका प्रेक्षक सोमवार ते रविवार रात्री आठ वाजता स्टारप्लसवर पाहू शकतात . टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता या मालिकेच्या आगामी भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


TRP List Of The Week: टीआरपीच्या शर्यतीत अनुपमा ठरली नंबर वन; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट