TRP List Of The Week: दर आठवड्याला प्रेक्षकच नाही तर मालिकांचे मेकर्स देखील टीआरपी रेटिंग्सची (TRP List Of The Week) आतुरतेने वाट पाहत असतात. कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे या टीआरपी रेटिंग्सच्या लिस्टमधून कळते. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या मालिकेने टीआरपी यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.
‘अनुपमा’ (Anupamaa)
'अनुपमा' मालिकेने टीआरपी यादीत पहिले स्थान पटकावले आहे. या मालिकेमध्ये सध्या सुरु असलेला मालती देवी आणि अनुपमा यांचा ट्रॅक प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai)
'ये रिश्ता क्या कहलाता है' हा शो टीआरपीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मालिकेतील अभिमन्यू आणि अक्षरा यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin)
‘गुम है किसी के प्यार में’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिसरा क्रमांक आहे. या मालिकेतील जनरेशन लीपमुळे चाहत्यांना ही मालिका सध्या आवडत आहे.
'ये है चाहतें' (Yeh Hai Chahatein)
'ये है चाहतें' ही मालिका टीआरपीच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी मिश्रा आणि शगुन शर्मा या नव्या जोडीची एन्ट्री झाली आहे. टीआरपीच्या यादीत पाचव्या आणि सहाव्या स्थानावर ‘इमली’ आणि ‘फालतू’या मालिका आहेत.
'पंड्या स्टोअर' (Pandya Store) या मालिकेनं टीआरपीच्या शर्यतीत सातवा क्रमांक पटकावला आहे. तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah), 'कुंडली भाग्य' आणि 'प्यार का पहला नाम राधा मोहन' या मालिका टीआरपीच्या यादीत आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. तर भाग्यलक्ष्मी (Bhagya Lakshmi) आणि कुमकुम (Kumkum) या मालिका या यादीमध्ये 11 व्या आणि 12 व्या स्थानावर आहेत.
टीआरपीच्या यादीमधील 13 वे आणि 14वे स्थान तितली आणि परिणीती या मालिकेनं पटकावलं आहे. तर 'नागिन 6' ही मालिका 15 व्या स्थानावर पोहोचली. टॉप 20 मधील शेवटचे पाच स्थान 'उडारिया', 'धरम पटनी', 'तेरी मेरी दोरियां', 'इंडियाज बेस्ट डान्सर' आणि 'रब्ब से है दुआ' यांना देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Anupamaa: अनुपमा आणि गुरुमा 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर थिरकल्या; व्हिडीओ व्हायरल