Rupali Bhosale: अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) ही छोट्या पडगद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. रुपाली ही आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच रुपालीनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
रुपाली भोसलेनं आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका सीनचं शूटिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'अभिनय म्हणजे रिअॅक्शन. रिअॅक्शन तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही चांगले श्रोते असता. त्या कपामध्ये चहा, कॉफी नसून पाणी आहे. खूप वेळा मी हा अनुभव घेतला आहे की, मोठा सीन असतो, तेव्हा आपले डायलॉग्स आहेत का? हे आधी बघायचं आणि असले की, ते पाठ करायचे. डायलॉग्स नसले की, मग काय ती स्क्रिप्ट परत देऊन टाकायची. माझा डायलॉग नाहीये तरी माझं नाव का लिहिलं असेल लेखकानं? हा विचार करायचा पण माझा विचार कायमचं वेगाळा होता, आहे आणि राहील. मला वाटतं जेव्हा आपल्याला सीनमध्ये डायलॉग्स नासतात तेव्हा कलाकर म्हणून जबाबदारी अजून वाढते. लेखकाने माझे नाव लिहिलंय म्हणजे माझी उपस्थिती महत्वाची आहे. डायलॉग नसला तरी माझ्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत. त्या मी तेवढ्याच प्रामाणिक पणे देणार, द्यायला हव्यात. बऱ्याच वेळा प्रेक्षक म्हनून मी सुद्धा डायलॉग बोलणाऱ्या कलाकारापेक्षा दुसरा कलाकार काय प्रतिक्रिया देतोय याकडे लक्ष देते.
पाहा व्हिडीओ:
पुढे रुपालीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'खूप मोठा व्हिडीओ आहे पण मुद्दाम तो एडिट केला नाही. हा इंडस्ट्रीमध्ये एक वर्ष झालं मला. पण एक गोष्ट मी कायम माझ्यासोबत ठेवली ती म्हणजे प्रामाणिकपणे काम करत रहायणे. “कॅज्युअल” दृष्टिकोन मला रील आणि वास्तविक आयुष्यात कधीच पटला नाही. तो कधी माझ्या कामत सुद्धा आला नाही. हा एक वर्षाच्या प्रवासात अनुभव, अनेक लोक आले आणि खूप काही शिकवून गेले. चांगल्या गोष्टींचं स्वागत केलं आणि वाईट गोष्टींचं सुद्धा केलं. असो बाकी सगळं उत्तम'
इतर महत्वाच्या बातम्या: