एक्स्प्लोर

FWICE कडून गौहर खानवर दोन महिन्यांचा प्रतिबंध

होम क्वॉरनटाइनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुंबई महापालिकेने गौहर खानच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला

मुंबई: कोरोनाबाधित असतानाही विलगीकरणाचे नियम न पाळल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या अभिनेत्री गौहर खानवर आता FWICE म्हणजेच सिनेकलाकारांच्या संघटनेने दोन महिन्यांची बंदी घातली आहे. कोरोनाची लागण झालेली असतानाही होम क्वॉरनटाइनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये टीव्ही अभिनेत्री गौहर खान विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE)ने गौहर खानच्या निष्काळजीपणावर कारवाई करत गौहरला दोन महिन्यासाठी इंडस्ट्रीतून बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एबीपी नेटवर्कला मुलाखत देताना FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारींनी सांगितलं की, "कोरोनाची लागण झालेली असूनही गौहर खानने होम क्वॉरनटाइनच्या नियमांचं उल्लंघन करणं चुकीचं आहे". 

तिवारी पुढे म्हणाले की, "गौहर खानने स्वतःला क्वारंटाईन न केल्यामुळे किती जणांना लागण झाली असेल, याचा विचारही केलेला नाही. होम क्वॉरनटाइनसाठी मुंबई महापालिकेने त्यांच्या हातावर स्टॅंप देखील मारला होता. तरीही गौहर खान घराबाहेर पडून इकडे-तिकडे फिरत होती, शूटिंगला जात होती. तिचं हे वागणं अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळेच फेडरेशनने त्यांना बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरेशनच्या सदस्य संघटना लवकरच गौहरच्या या वर्तणुकीबद्धल तिला नोटीसही पाठवणार आहेत". 

बी. एन. तिवारी म्हणाले की, आज कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोना झाल्यावर मोठे कलाकार देखील सर्व नियमांचं पालन करतात. त्यामुळे गौहरने देखील या सर्व नियमांचं पालन करायला हवं होतं. 

मुंबई पोलिसांचे प्रवक्ते एस. चैतन्य यांनी सोमवारी एबीपी न्यूजला माहिती देताना सांगितलं की, कोविड-19 च्या नियमांचं उल्लंघन केल्याने आणि कोरोनाची लागण झालेली असतानाही शूटिंगला गेल्यामुळे ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये  साथरोग अधिनियम (1897) अन्वये गौहर खान विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

गौहर खान कार्यालयाकडून सोमवारी रात्री, गौहर खानची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं. तसंच गौहर खान मुंबई महापालिकेला पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावाही तिच्या कार्यालयाकडून करण्यात आला. 

महत्त्वाच्या बातम्या

Actress Maera Mishra Welcome Baby Girl: 'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली 'लक्ष्मी'; दिवाळीच्या 4 दिवस आधी दिली गुडन्यूज, चिमुकलीची शेअर पहिली झलक
'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली 'लक्ष्मी'; दिवाळीच्या 4 दिवस आधी दिली गुडन्यूज, चिमुकलीची शेअर पहिली झलक
Tarini Fame Actress Ashwini Gorle On Bold Paithani Dress: मराठी अभिनेत्रीनं घातला पैठणीचा बोल्ड ड्रेस, फोटो व्हायरल होताच तुफान ट्रोलिंग; स्वतःची बाजू मांडताना म्हणाली, 'पैठणीचा अपमान...'
मराठी अभिनेत्रीनं घातला पैठणीचा बोल्ड ड्रेस, फोटो व्हायरल होताच तुफान ट्रोलिंग; स्वतःची बाजू मांडताना म्हणाली, 'पैठणीचा अपमान...'
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Veen Doghantli Hi Tutena Samar Swananadi Pregnant: 'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO
'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Embed widget