एक्स्प्लोर

राजेशने थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या, असं वाटतंय : रेशम टिपणीस

बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात रेशम टिपणीस चांगलीच चर्चेत राहिली होती. मग ते राजेश शृगांरपुरेसोबतची रिलेशनशिप असो वा मेघा-सईसोबतचं टशन, तिला चाहत्यांचा कायमच पाठिंबा मिळाला.

मुंबई : राजेशने त्याच्या थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या हे बाहेर आल्यावर मला वाटतंय, अशी प्रतिक्रिया बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री रेशम टिपणीसने दिली आहे. बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात रेशम टिपणीस चांगलीच चर्चेत राहिली होती. मग ते राजेश शृगांरपुरेसोबतची रिलेशनशिप असो वा मेघा-सईसोबतचं टशन, तिला चाहत्यांचा कायमच पाठिंबा मिळाला. परंतु बिग बॉसचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला असताना रेशम टिपणीसची यातून एक्झिट झाली आहे. यावेळी तिने राजेशसोबतच्या अफेअर्सच्या चर्चांसह टास्कबद्दल गप्पा मारल्या. आमची शुद्ध मैत्री "मी आणि राजेशने काही चुकीचं केलं असं वाटत नाही. प्रेम, दोस्ती, बॉण्डिंग व्यक्त करण्याचा प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो. मी अशीच आहे. कॅमेऱ्यासमोर एक कॅमेऱ्यामागे एक वागत नाही. राजेश विवाहित पुरुष आहे, त्याला पत्नी, दोन मुली आहेत. त्याला त्याच्या लिमिट्स माहित आहेत आणि पाहिजेत. त्याला कोणाला तरी उत्तर द्यायचंय. अशा गोष्टींमध्ये मुलीचं नाव जास्त खराब होतं. मुलांपेक्षा मुलींवर जास्त परिणाम होतं. मी प्रेक्षकांना दोष देणार नाही. त्यांना जसं दिसलंय तसंच ते त्यावर रिअॅक्ट झाले आहेत. तर ते चुकीचं नाही. प्रेक्षकांनी जे पाहिलंय ते दीड तासाचं आहे. घरात 24 तासात जे घडलंय त्यापैकी बरंच प्रेक्षकांपर्यत पोहोचलं नाही. मी बाहेर आल्यानंतर या गोष्टी मला कळल्या. जे दाखवलंय त्यावरुनच प्रेक्षक विचार करणार की, यांचं अफेअर आहे. आमची शुद्ध मैत्री होती. मी आजही म्हणतेय तो माझा चांगला मित्र आहे. मी त्याला खूप आधीपासून ओळखते. त्याच्यासोबत माझा कम्फर्ट लेव्हल खूप चांगला होता," असं रेशमने सांगितलं. राजेशने लिमिट्स क्रॉस केल्या रेशम म्हणाली की, "राजेशने त्याच्या थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या हे बाहेर आल्यावर मला वाटतंय. तरी मी त्याला सांगायचे, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुला होऊ शकतो. तो कॅमेऱ्यावर बायकोला बोलला त्यावेळी मी त्याला बोलले होते की, तुझी बायको घरी एकटी आहे, दोन मुली आहे. बायको बघेल, तुला आवडणार नाही, तू याला ओके आहेस का? तर तो म्हणाला होता की, माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास आहे." रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार मला काहीच उत्तर द्यावं लागलं नाही "माझा बॉयफ्रेण्ड आहे, तो मला आतून-बाहेरुन पूर्ण ओळखतो. आम्ही रिलेशनशिपमध्ये असण्यापेक्षा आम्ही बेस्ट फ्रेण्ड आहोत. माझा स्वभाव कसा आहे हे त्याला माहित आहे. बाहेर पडल्यानंतर त्याने मला मिठी मारली आणि तू माणूस म्हणून कशी आहेस हे मला माहित आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, असं म्हणाला. तिथेच विषय संपतो. मला काही उत्तर द्यावंच लागलं नाही," असंही रेशम टिपणीसने नमूद केलं. आमच्याकडे एकमेकांचा फोन नंबरही नाही रेशम पुढे म्हणाली की, "बाहेर पडल्यानंतर राजेश भेटला नाही. मी राजेशसोबत काम केल्यानंतर त्याला मुंबईत कधी भेटले नाही. विश्वास बसणार नाही, पण माझ्याकडे त्याचा फोन नंबरही नाही. त्याच्याकडेही माझा नंबर नाही. आम्ही खूप वर्षांनंतर भेटलो ते थेट बिग बॉसमध्ये. तिथे मला पूर्णपणे ओळखणारा मित्र भेटल्यानंतर कम्फर्ट लेव्हल असणारच ना." संपूर्ण मुलाखत

महत्त्वाच्या बातम्या

Gaurav More: गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
Akanksha Choudhary: 'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
Marathi Actress Second Marriage: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget