मुंबई : एकता कपूरने अखेर ऑल्ट बालाजी या तिच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलेल्या 'ट्रिपल एक्स -2’ या शोमध्ये जवानांच्या कटुंबियांचे कथिकरित्या अश्लील चित्रण केल्याच्या प्रकरणावर आपलं मौन सोडलं आहे. दरम्यान, या शोमधून आधीच अनेक विवादित सीन्स हटवण्यात आलेले आहेत. परंतु, तरिही देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये शो आणि एकता कपूरच्या विरोधात दाखल करण्यात येणाऱ्या तक्रारी आणि सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे एकता कपूरने स्वतः समोर येत आपली बाजू मांडली आहे.


एकता कपूरने याप्रकरणी बोलताना सांगितले की, 'एक नागरिक आणि एक संघटना म्हणून आम्ही भारतीय सैन्याचा अत्यंत आदर करतो. त्यांचं आपली काळजी आणि सुरक्षिततेमध्ये महत्वाचं योगदान आहे. यात काहीही शंका नाही. आम्हाला एखाद्या मान्यताप्राप्त लष्करी संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले गेले तर आम्ही बिनशर्त माफी मागण्यास तयार आहोत.'


एकता कपूरने या संपूर्ण वादविवादानंतर सतत येणाऱ्या बलात्काराच्या धमक्यांबाबतही शोभा डे यांच्याशी संवाद साधला आणि म्हणाली की, 'आम्ही असभ्य पद्धतीने करण्यात येणाऱ्या साबर बुलिंग आणि असाममाजिक घटांमार्फत देण्यात येणाऱ्या बलात्काराच्या धमक्यांपुढे अजिबात झुकणार नाही.' एकताने यासंदर्भात बोलताना सांगितले की, कशाप्रकारे शोमधील एका सेक्स सीनमुळे फक्त तिलाच नाही तर तिची 71 वर्षीय आई शोभा कपूर यांनाही बलात्काराच्या धमक्या देण्यात येत आहेत. एकताने बोलताना ट्रोलर्सची ही कृती अत्यंत लज्जास्पद असल्याचं सांगितलं.


एकता कपूर म्हणाली की, 'शोमधील विवादित दृश्याचे चित्रण काल्पनिक होते आणि त्याबाबत आमच्याकडून चूक झाली होती. जी आम्ही सुधारली आहे. त्यामुळे सदर प्रकरणी माफी मागणं माझ्यासाठी फारशी मोठी गोष्ट नाही. परंतु, याप्रकरणावरून ज्याप्रकारे धमक्या देण्यात येत आहेत. त्यांना अजिबात सभ्य म्हणता येणार नाही.' एकता कपूरने शोभा डे यांच्याशी बोलनाता अनेक गोष्टींना वाचा फोडली. यासंदर्भातील एक व्हिडीओही शेअर करण्यात आला.


सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दोन दिवसां अगोदर गुरुग्राममधील पालम विहार पोलीस स्थानकात एकता कपूर विरोधात 'मार्टीज वेल्फेयर फाउंडेशन' चे अध्यक्ष आणि माजी सैनिक मेजर टी. राव यांच्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये आपल्या कर्तव्यावर घरापासून दूर असलेल्या सैनिकांच्या पत्नी दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवत असल्याच्या दृश्यांवर विरोध दर्शवला होता. त्याचबरोबर या शोमधील सैन्य दलासंदर्भातील इतर दृश्यांवरही आक्षेप घेण्यात आला होता.


इंदोरमधील अखिल भारतीय क्षत्रिय महासभाने तेथील डीआयजींना एक पत्र लिहून शोमधील वादग्रस्त दृश्यांमुळे एकता कपूर विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच इंदोरमध्ये राहणाऱ्या नीरज याग्निक नावाच्या व्यक्तीने अन्नपूर्णा स्थानकात तक्रार दाखल करत एकता कपूर विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोपही एकता कपूरच्या शोवर लावला आहे.


दरम्यान, सर्वात आधी हिंदुस्थानी भाऊ या नावाने प्रसिद्ध असेल्या युट्यूबर आणि त्यानंतर 'बिग बॉस 13' मध्ये सहभागी असलेल्या विकास फाटकने एकता आणि 'ट्रिपल X-2'च्या विरोधात आवाज उठवला होता. तसेच एकता कपूरला नोटीस पाठवून 14 दिवसांमध्ये या नोटीसचं उत्तर देत देशाची माफी मागण्यासही सांगितलं होतं. असं न केल्यास एकता कपूर विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचंही या नोटीसमध्ये सांगण्यात आलं होतं.


संबंधित बातम्या : 


कन्नड स्टार चिरंजीवी सरजाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन


अमिताभ बच्चन यांना सेटवर नो एन्ट्री! नियमावलीमुळे ज्येष्ठ कलाकारांची गोची


Basu Chatterjee Passes Away | प्रसिद्ध दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन