Dipika Chikhlia Trolled : ‘रामायण’ (Ramayana) फेम अभिनेत्री दीपिका चिखलियाला (Dipika Chikhlia) सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. याचं कारण ठरलंय ते तिने दिलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.. स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिनेत्रीने तिरंगा हातात घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोत काहीही चुकीचे नव्हते. पण, ट्विटवर या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने चुकून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना टॅग केले होते.

Continues below advertisement


15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा हा विशेष दिवस देशभरात जल्लोषात साजरा करण्यात आला. सरकारने प्रत्येक घरात तिरंगा लावण्याची मोहीम सुरू केली, त्यात लोकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. सिनेविश्वाशी निगडित स्टार्सनीही आज आपल्या घरावर तिरंगा फडकवला. अभिनेत्री दीपिका चिखलियानेही आपल्या घरात तिरंगा फडकावला, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. पण, यावेळी तिच्याकडून एक चूकही झाली, ज्यामुळे ती आता ट्रोल होत आहे.


पाहा पोस्ट :




इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच दीपिका चिखलियानेही 'हर घर तिरंगा' मोहिमेला फॉलो करत हा फोटो पोस्ट केला होता. पांढरा पलाझो आणि कुर्ता परिधान केलेल्या दीपिकाने एका हातात तिरंगा आणि एका हाताने सलामी देत ​​क्लिक केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आपल्या सर्वांना 75व्या स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा.’ ही पोस्ट तिने चुकून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना टॅग केली. आता यूजर्सना या ट्विटमुळे अभिनेत्रीची खिल्ली उडवण्याची संधी मिळाली आहे. अनेक युजर्सनी ट्विटरवर अभिनेत्रीला उद्देशून मजेदार मीम्स पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.


सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस


दीपिकाने तिची पोस्ट पाक पीएमओला टॅग करताच, सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात झाली. दीपिकाला ट्रोल करत एका युजरने रामायणातील लक्ष्मणाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'हाय प्रभु, मला हे मायाजाल वाटत आहे.’ त्याचवेळी आणखी एक युजरने लिहिले की,'तुम्ही चुकीच्या पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे की, तुम्हाला पाक पंतप्रधानांना दुखवायचे आहे?' अशाच अनेक कमेंट्स दीपिकाच्या पोस्टवर आल्या आहेत. आपली चूक लक्षात आल्यानंतर अभिनेत्री दीपिका चिखलियाने ही पोस्ट लगेच डिलीट केली. प्रसिद्ध ‘रामायण’ या मालिकेत माता सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री या भूमिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली होती.


हेही वाचा :


Happy Birthday Dipika Chikhalia : ‘माता सीता’च्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचल्या, आता राजकारणातही सक्रिय झाल्या दीपिका चिखलिया!