एक्स्प्लोर

बिग बॉसच्या घरात हायवोल्टेज ड्रामा, झुबेरची सलमानविरोधात तक्रार

वीकेंड वारमध्ये सलमान खानचा दबंग अवतार पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात शिवीगाळ करुन वातावरण बिघडवणाऱ्यांची सलमानने शाळा घेतली. पण जुबैर खानवर सलमान जास्तच नाराज होता.

मुंबई : 'बिग बॉस सीझन 11' च्या पहिल्या आठवड्यात घराबाहेर पडलेला स्पर्धक झुबेर खानने सलमान खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. होस्ट सलमानने धमकी दिल्याने आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत झुबेरने मुंबईच्या अँटॉप हिल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत काय लिहिलंय? झुबेरने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "सलमानने मला नॅशनल टीव्हीवर इंडस्ट्रीमध्ये काम करु देणार नाही अशी धमकी दिली. तसंच बाहेर पडल्यावर कुत्रा बनवण्याचंही म्हटलं." झुबेरने अँटॉप हिलमध्ये नोंदवलेली लेखी तक्रार लोणावळा पोलिसांनाही पाठवली आहे. झुबेरच्या तक्रारीची कॉपी Jubair_Complain सलमान आणि कलर्सवर गंभीर आरोप झुबेरने सलमान खान आणि कलर्स चॅनलवर आरोप करताना म्हटलं आहे की, "मी कधीही स्वत:ला दाऊदची बहिण हसीना पारकरचा जावई समजलं नाही. कलर्सच्या लोकांनी मला जी वाक्य बोलायला सांगितली ती मी माझ्या व्हिडीओत बोललो. सलमानने मला सगळ्यासमोर धमकी दिली, ज्याचं मी कायदेशीर उत्तर देणार आहे." "सलमान खानला घाबरायला मी विवेक ओबेरॉय नाही," असंही झुबेर म्हणाला. "कलर्स चॅनलच्या लोकांनी जाणीवपूर्वक मला सरकारी रुग्णालायत दाखल न करता खासगी रुग्णालयात दाखल केलं," असा आरोपही झुबेर आणि त्याच्या वकिलांनी केला आहे. सलमानचा दबंग अवतार वीकेंड वारमध्ये सलमान खानचा दबंग अवतार पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात शिवीगाळ करुन वातावरण बिघडवणाऱ्यांची सलमानने शाळा घेतली. पण झुबेर खानवर सलमान जास्तच नाराज होता. Zuber_Salman_1 सलमानने रागाच्या भरात झुबेरला 'नल्ला डॉन' म्हटलं. सलमान एवढ्यावरच थांबला नाही, तो झुबेरला फ्रॉड म्हणाला. जेव्हा झुबेरने सलमानला 'सॉरी भाई' बोलला, तेव्हा तर तो आणखी भडकला आणि म्हणाला की, "तू मला भाई बोलायचं नाही." सलमान म्हणाला की, "नाव खराब करण्यासाठी इथे येतात, आईचं नाव धुळीला मिळवणार, मोहल्ल्याचं नाव खराब करणार आणि काय बोलणार तर मुलांसाठी आलोय." सलमानने झापल्यानंतर झुबेर टेन्शनमध्ये आला आणि खूप गोळ्या खाल्ल्या. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. झुबेरचा नेमका वाद काय? झुबेरचं घरातील अर्शी खानसोबत जोरदार भांडण झालं होतं. अर्शीला शिवीगाळ करत तिला अपशब्द वापरले होते. झुबेर खान स्वत:ला हसीना पारकरचा जावई आणि हसीना चित्रपटाचा निर्माता असल्याचं सांगतो. परंतु सत्य वेगळंच आहे. हसीना चित्रपटाचा सह निर्माता आणि दाऊद कुटुंबातील सदस्य समीर अंतुलेने झुबेरला फ्रॉड म्हटलं आहे. जुबैरचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. तो प्रसिद्धीसाठी दाऊदचं नाव वापर करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget