Vicky Kaushal Special Appearance on Marathi TV Show : स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत सध्या 'श्री आणि सौ स्पर्धे'ची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता असतानाच जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे. हा खास पाहुणा म्हणजे सुप्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता विक्की कौशल. विक्की कौशलच्या 'छावा' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. याच सिनेमाच्या निमित्ताने विक्की कौशलने घरोघरी मातीच्या चुलीच्या सेटवर खास हजेरी लावली.
छावा चित्रपटाच्या निमित्ताने विकी कौशलची मराठी मालिकेत एन्ट्री
सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत श्री आणि सौ स्पर्धा अटीतटीची होतेय. जानकी आणि ऋषिकेश अतिशय जिद्दीने ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जानकी-ऋषिकेशला प्रोत्साहन देण्यासाठी विक्कीने खास टिप्स दिल्या. 'खेळ असो नाहीतर लढाई, हिंमत कधी हरायची नाही. खेळ जर जिंकायचाच असेल तर गनिमी काव्याने सुद्धा जिंकता येतो. लढाई आपल्या माणसांच्या भरोशावर लढायची असते. आपल्या टीमला सोबत घेऊन लढायची असते. आणि जगात नवरा बायको पेक्षा भारी टीम दुसरी कुठलीच नसते. तेव्हा जिद्दीने लढा द्या', असा कानमंत्र देत विक्की कौशलने जानकी-ऋषिकेशला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत छावा सिनेमा पहाण्याचं आमंत्रणही दिलं आहे.
मातीच्या चुलीच्या सेटवर विक्की कौशलची खास हजेरी
जानकी-ऋषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे विक्कीसोबतचा शूटिंगचा दिवस कायम स्मरणात ठेवतील. सुरुवातीला विक्कीसोबत काम करण्याचं दडपण होतं. मात्र हे दडपण दूर केलं. त्याच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मराठी भाषेवर त्याचं विशेष प्रेम आहे. मालिकेतला सीन मराठीमध्ये असल्यामुळे त्यांनी शूटिंग सुरु होण्यापूर्वी संपूर्ण टीमशी संवाद साधला. मालिकांचं शूट नेमकं कसं होतं, उच्चार कसे असायला हवे, अश्या बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. आम्हा सर्वांसाठीच ही फॅन मोमेंट होती अशी भावना रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांनी व्यक्त केली.
विक्की कौशलसोबतचा हा खास भाग पाहायचा असेल तर नक्की पाहा 'घरोघरी मातीच्या चुली' सायंकाळी 7.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर आणि 14 फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 'छावा' चित्रपट पाहायला विसरु नका.
महत्त्वाच्या इतर बातम्या :