Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण अनेक कलाकार सध्या हा शो सोडून जात आहेत. त्यामुळे या शोमध्ये काही नव्या कलाकारांची एन्ट्री होणार आहे,असं म्हटलं जात आहे.  लवकरच बिट्टू (Bittu) हा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये सहभागी होणार आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की बिट्टू हा टप्पूची जागा घेणार आहे की नाही? काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, टप्पू ही भूमिका साकारणारा अभिनेता राज अंदकत (Raj Anadkat) हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्यानं तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सोडला आहे. 

Continues below advertisement


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या एका भागामध्ये बिट्टू या सोढीच्या मित्राच्या मुलाची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. या मुलाला पाहिल्यानंतर बिट्टू हा टप्पूला रिप्लेस करणार आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 


पाहा व्हिडीओ



गेल्या काही दिवसांपासून मालिकेत टप्पू हे कॅरेक्टर शोमध्ये दिसत नाहीये. टप्पू हा मुंबईच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी गेला आहे, असं या मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे टप्पू ही भूमिका साकारणाऱ्या राज अंदकतनं ही मालिका सोडली आहे, असं म्हटलं जात आहे. 


अभिनेता राज अंदकत 2017पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘टप्पू’ची भूमिका साकारत आहे. या आधी अभिनेता भव्य गांधी या मालिकेत ‘टप्पू’ साकारत होता.


या कलाकारांनी सोडला शो


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी हा शो सोडला आहे. तसेच दया ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानी यांनी देखील हा शो सोडला. 


हेही वाचा: