मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी 3’ चा शानदार ग्रँड फिनाले पार पडला. सना मकबूलने (Sana Makbul) बिग बॉस ओटीटी 3 ची विजेती ठरली. सनाने नेझीला कडव्या लढतीत पराभूत केलं आणि ट्रॉफी आपल्या नावावर केली. रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल, नाझी आणि कृतिका मलिक हे शेवटचे पाच फायनलिस्ट होते. सनानेने कृतिका मलिक, रणवीर शौरे, नेझी, सई केतन राव यांचा पराभव केला आहे. सना या सीझनची विजेती ठरली असून तिला 25 लाखांचे रोख बक्षीस मिळालं आहे.  पण, 25 लाखांव्यतिरिक्त सनाने बिग बॉसच्या घरातून लाखो रुपये कमावले आहेत. 


25 लाखांव्यतिरिक्त सनाची कमाई 


बिग बॉस विजेती सना मकबूलने 25 लाखांच्या बक्षीस व्यतिरिक्तही कमाई केली आहे. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार, सनाने या शोमध्ये येण्यासाठी दर आठवड्याला सुमारे दोन लाख रुपये मानधन घेतलं. बिग बॉस ओटीटी शो 42 दिवस चालला. यामुळे 25 लाखांव्यतिरिक्त सना मकबूलची फी 12 लाख रुपये झाली आहे. या शोमधून सनाने एकूण 37 लाखांची कमाई केली आहे. सना मकबूलचा शोमधील प्रवास खूपच रंजक होता. तिची नेझीसोबत चांगली मैत्री झाली आणि रणवीर शौरीसोबतही वादही झाले.






सनाचा 42 दिवसांचा प्रवास कसा होता?


बिग बॉस ओटीटी 3 च्या ग्रँड फिनालेदरम्यान, सना आणि नेझी यांनी त्यांच्या घट्ट मैत्रीबद्दल सांगितलं. सनावर विश्वास ठेवू नये, असा सल्ला नेझीला घरातील इतर सदस्यांनी दिला होता. तरीही, त्यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली. सनाने नेझीला सतत पाठिंबा दिला आणि त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि त्याला आपली बाजू मांडण्यास मदत केली. शो जिंकल्यानंतर, सना मकबूलने बिग बॉसच्या घरातील तिच्या 42 दिवसांच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.






"पहिल्या दिवसापासून मला ट्रॉफी जिंकायची होती"


सनाने सांगितलं की, तिला सुरुवातीपासूनच शो जिंकायचा होता. सना म्हणाली, पहिल्या दिवसापासून मला ट्रॉफी जिंकायची होती आणि मी तेच माझे ध्येय बनवले. आज जेव्हा माझ्याकडे ट्रॉफी आहे, तेव्हा मी कृतज्ञ आहे.  इंडिया टुडेशी बोलताना सना पुढे म्हणाली की, शोमधील तिचे बहुतेक स्पर्धक तिला आवडले नाहीत. लोकांच्या निर्णयाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला आहे.


"घरातील 80 टक्के सदस्यांना मी आवडले नाही"


सना म्हणाली, माझा एनर्जीवर विश्वास आहे आणि माझ्या आजूबाजूला सकारात्मकता नव्हती. घरातील 80 टक्के लोकांना मी आवडले नाही. जर मी चांगलं वागलं किंवा दयाळूपणा दाखवला किंवा माझ्या भावना व्यक्त केल्या तेव्हा लोकांना मला नावं ठेवली. याने मला स्वतःलाच प्रश्न करायला भाग पाडलं की, मी चूकली आहे का? काही लोक मला नेहमी कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे माझे मनोबल खचले. ते मला त्यांच्या बाजूने वळवण्याच्या प्रयत्नात होते, पण सिंहीणीला कधीच नियंत्रणात ठेवता येत नाही, हे त्यांना माहीत नव्हतं, असं तिने म्हटलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : सगळ्यांशी वाद घालणाऱ्या निक्कीशी सूरज घेणार पंगा, 'गुलीगत किंग' म्हणत दाखवणार इंगा