Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा (Bigg Boss Marathi Season 5) पहिला भाऊचा धक्का आता पार पडणार आहे. या पाचव्या सिझनची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. पहिलाच आठवडा स्पर्धकांनी पूर्णच गाजवून टाकला. त्यांची भांडणं, टास्क खेळण्याची स्ट्रॅटजी या सगळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता आठवड्याचा पहिला विकेंडचा एपिसोड म्हणजेच भाऊचा धक्का पार पडणार आहे. यामध्ये रितेश (Ritiesh Deshmukh) कुणाची शाळा घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 


टेलिव्हिजनचा सर्वात मोठा कार्यक्रम अर्थात 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची सर्वत्र चांगलीच हवा आहे. रितेश भाऊची हटके स्टाईल आणि 16 सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला 'भाऊचा धक्का' पार पडणार आहे. या 'भाऊच्या धक्क्या'वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. पण त्याआधीच 'भाऊचा धक्का' हे गाणं 'बिग बॉस'प्रेमींच्या भेटीला आलं आहे.           


बिग बॉसचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पूर्णपणे वेगळा आहे. रितेश भाऊ त्याच्या स्टाईलने कल्ला करत यंदाचा सीझन रंगवताना दिसत आहे. आता आपल्या हक्काच्या भाऊच्या धक्क्यावर भाष्य करणारं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


"लपून सारी, बघुन बारी, डोक्यात त्याच्या गेलंया,
साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलंया,
हटके स्टाईल, किलर स्माईल, धिंगाना याचा करंलं",असे या गाण्याचे बोल आहेत. रितेश भाऊ कोणाची शाळा घेईल तर कोणाचं कौतुक करेल. एकंदरीतच भाऊच्या धक्क्यावर तो स्पर्धकांचा हिशोब घेणार आहे. त्यामुळे कल्ला तर होणारच...'भाऊचा धक्का' या गाण्यात रितेश भाऊचा रुबाब पाहायला मिळत आहे. त्याचा हटके स्वॅग स्टाईल आणि उत्साह या गाण्यात परफेक्ट दिसून येत आहे. रितेश भाऊ 'भाऊच्या धक्क्यावर' घरातील सदस्यांचा हिशोब पक्का करणार आहे. त्यामुळे हा 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजणार.               






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 : आठवडाभर घरात घातला राडा, आता रितेश भाऊच्या धक्क्यावर कुणाची घेतली जाणार शाळा?